कोपर्डीतून ठरणार मराठा आरक्षणाची पुढील रणनीती!

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भेट देणार आहेत. यावेळी ते पीडितेचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कोपर्डी येथील घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने राज्यभर मोर्चे काढले. आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन सुरू होत … Read more

कुटुंबीय गेले शेतात तोपर्यंत चोरट्याने घर केले साफ

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील पाटेगावनजीकच्या वाघनळी येथे चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घरावर डल्ला मारला आहे. या चोरट्याने घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोने व इतर मुद्देमाल लंपास केला. याबाबत अधिक … Read more

दारू पिऊन हातात शस्त्र घेऊन दहशत करणाऱ्यास १४ दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे हातात धारदार शस्त्र घेऊन गावात नागरिकांच्या अंगावर धावून जाणे,घरातील लोकांना मारहाण करणे अशा प्रकारे दहशत माजवल्याप्रकरणी विकास दिलीप शिंदे,वय २४ वर्ष याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गावातील जनता भयभीत झाली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,विकास शिंदे हा दारूच्या नशेत हातात धारदार … Read more

हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दारुड्याला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील इस इसम दारूच्या नशेत तर्रर्र होऊन हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत होता. या दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास … Read more

लाचखोर तलाठी रंगेहाथ पकडला ; सहकारी फरार झाला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला असता तलाठ्याकडून लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचखोर तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. होता. चंद्रकांत गजाबा बनसोडे (५६) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय ४०, रा. … Read more

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरु केले उपोषण आश्वासनानंतर मागे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी आरक्षित असेलल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ केसकर यांनी त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्यासह उपोषण सुरु केले होते. सविस्तर प्रकरण असे कि, तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी शासनाने स्मशानभूमीसाठी ५ आर. क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तरीही येथे दफनविधी … Read more

भाच्याचे कारस्थान मामीने केले उघड; पितळ उघड पडताच आरोपी फरार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मामाकडून पैसे न मिळाल्यामुळे रागातून भाच्याने मामाविरुद्ध कट रचला अन तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे गाठले. मात्र भाच्याचे बिंग मामीने उघडकीस आणले. दरम्यान हा प्रकार कर्जात तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा कर्जत रोडवर दूरगाव फाटा येथे दोन अज्ञात मोटारसायकल स्वरांनी आरोपी सागर निंभोरे याला … Read more

विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील दामू उंदरू पाटील यांची म्हैस विजेचा धक्का लागून दगावल्याची घटना समोर आली आहे.सदर घटना रविवार दिनांक 6 जून ला सकाळी ८ वा. सुमारास घडली आहे. दामू पाटील यांचा परंपरागत दुग्धव्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास म्हशी माळरानावर चरत असताना अचानक पडलेल्या जिवंत विजेच्या तारेमध्ये … Read more

आमदार रोहित पवारांनी परराज्यातून उपलब्ध केले बियाणे !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जामखेडच्या खरीप पिक पुर्वनियोजनाचे गणित अखेर जुळले आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यासह परराज्यातूनही उपलब्ध बियाणे उपलब्ध केले आहे. गावांचे तीन गट करून कर्जत तालुक्यात ३५ तर जामखेड तालुक्यात घेतल्या ३० बैठका राजेंद्र पवार यांनी घेतल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विभाग व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था … Read more

गस्तीवर असलेल्या पोलिसाला पाहताच डिझेल चोर माल सोडून पळाले

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ते कुळधरणमध्ये येताच डिझेल चोरांनी एक मोटारसायकल, डिझेलचे ड्रम व साहित्य रस्त्यावर टाकून पळ काढला. त्यामुळे डिझेल चोरीची घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे गस्तीवर असताना पहाटे कुळधरणमधून जात होते. … Read more

आरोग्य कर्मचाऱ्याने चोरली एक लस; नातेवाइकला देण्यासाठी केला खटाटोप

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे बनून बसले आहे. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा होणार तुटवडा यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. आपल्यालाही लस मिळावी यासाठी सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील धावपळ करू राहिले आहे. यातच जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने … Read more

दशक्रिया विधीसाठी ग्रामपंचायतीने लावला ‘मुंडन कर’

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोना काळात कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथे दशक्रिया विधीच्या नावाखाली नागरिकांची मोठी लूट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दशक्रिया विधींना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील सिद्धटेक येथे दशक्रिया विधी सुरू ठेवण्यात आले आहेत. रोज साधारण २० ते २५ दशक्रियाविधी भीमेच्या घाटावर होतात. या दशक्रिया विधीसाठी … Read more

पोलिसांवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कर्जत शहरातील शिवाजी मोहन दंडे यांच्या घरी चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी ही नवनाथ ऊर्फ अंड्या देविदास भोसले (रा. येडेवस्ती, खोरवडी, ता. दौंड) याने केली आहे. त्यानुसार … Read more

तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून वाळूचा ट्रॅक्टर पळविला

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कर्जत येथील महसूल विभागाच्या पथकाने घुमरी येथील सीना नदीच्यापात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. मात्र या कारवाईत तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि, अवैध वाळू उपसा कारवाई केलेले दोन्ही ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन … Read more

अखेर पोलिसांनीच घातला सावकारकीला आळा !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विनापरवाना खाजगी सावकारकीचे नवनवीन किस्से कर्जत पोलिसांच्या आवाहनामुळे समोर येऊ लागले आहेत. आपल्या मनाप्रमाणे व्याजाचे दर ठरवून संबंधितांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची, कधीकधी तर घेतलेल्या रकमेपेक्षा तिप्पट-चौपट रक्कम देऊनही जमिनीचे खरेदी खत नावावर करून घ्यायचे किंवा स्वाक्षरी करून घेतलेले धनादेश वटवायचे अशा … Read more

‘या’ तालुक्यातील दोन गुन्हेगार एका वर्षासाठी पाच जिल्ह्यातून तडीपार

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन येथील दोघांना नगर जिल्ह्यासह सोलापुर, बीड,औरंगाबाद,पुणे या पाच जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. राम जिजाबा साळवे (वय २६), सागर नवनाथ साळवे … Read more

सिना नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसीलदारांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत जिल्ह्यात वाळू तस्करी जोरात सुरु झाली आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर गर्दी नसल्याचा वाळूतस्कर फायदा घेत आहे. मात्र याला आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात वाळू तस्करांच्या विरोधात एक कारवाई पार पडली आहे. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील सिना नदी … Read more

साप चावल्याने तेरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  एका तेरा वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. स्नेहल राहुल काळे (वय -१३) असे मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहल ही रात्री टेरेसवर झोपलेली होती. रात्री साडेअकरा वाजता टेरेसवरून उठून खाली खोलीकडे जात असताना तिला सर्पदंश … Read more