चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

 कोपरगाव: चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणारा अमोल अशोक निमसे याला पाचव्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सत्र न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पीडित मुलगी सुरेगाव (कोळपेवाडी) येथील शाळेत चौथीत शिकते आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपीने खोटी ओळख सांगून … Read more

आ. काळेंनी ना. जयंत पाटलांकडे केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघापासून जवळपास १०० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा व येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू … Read more

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डीत सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, … Read more

संतापजनक : फार्महाऊसवर राखणदार म्हणून काम करणार्या तरुणाने चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत केल हे कृत्य

कोपरगाव :- तालुक्याच्या पश्चिम भागातील वेळापूर येथील चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा पीडित मुलीला सोडून फरार झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत. पीडित मुलगी सुरेगाव येथे चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव कंटेनरच्या धडकेत युवती ठार

कोपरगाव :- सिन्नर – शिर्डी रोडवर देर्डे कोहाळे शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत किरण संतोष गडाख (वय १८) हिचा मृत्यू झाला, तर विकास निरगुडे हे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला. यासंबंधी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक अर्जुन निरगुडे याचा चुलतभाऊ विकास व त्यांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार !

कोपरगाव :- तालुक्यातील सुरेगाव येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे शाळा सुटल्यानंतर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी याच गावातील तरुण अमोल अशोक निमसेविरुध्द बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी  आरोपीने मोटारसायकलवरुन मुलीचे अपहरण केले होते. शनिवारी मुलगी गावामध्येच आढळून आली. त्यानंतर तिने तिच्याबरोबर … Read more

शिर्डी – कोपरगाव राज्यमार्गावर मृतदेह आढळला

कोपरगाव : तालुक्यातील तीनचारी येथे शिर्डी- कोपरगाव दरम्यान राज्यमार्गावर शेती महामंडळाच्या जमिनीत काटेरी झुडपात अंदाजे ५८ वर्षे वय असणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. शुक्रवारी (दिनांक १३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास या भागात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला हा मृतदेह दिसला. त्याने आसपासच्या नागरिकांना याबाबत सांगितले. ही माहिती पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले. या इसमाच्या डाव्या हाताच्या नसा … Read more

आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये

कोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान … Read more

विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले !

कोपरगाव : ‘तू आम्हाला आवडत नाहीस, तू आम्हाला नको आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे’, असे म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिला घराबाहेर काढून दिल्याच्या प्रकरणात पती व सासरा यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजिरी शार्दुल देव (वय ३०, रा. श्रीराम मंदिराच्या … Read more

आवर्तन पाहिजे असेल तर थकीत पाणीपट्टी भरा !

कोपरगाव : गोदावरी उजव्या कालव्याला रब्बी आवर्तन सुटणार असून, आधी थकीत पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. रब्बी आवर्तन नसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणीचा ७ नंबर फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र, ज्यांची थकीत पाणीपट्टी असेल त्यांना पाणीपट्टी भरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीची पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील … Read more

अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

कोपरगाव : कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले की, आपली मुलगी ब्युटी पार्लरच्या क्लासला गेली असता परत घरी आलीच नाही. शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. म्हणून कोणा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीला पळवून नेले … Read more

काकडी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्या

कोपरगाव : देशाच्या व जगातील साई भक्तांना शिर्डी येथे साई दर्शनाला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणले होते. या विमानतळासाठी काकडीच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विमान प्राधिकरनाणे या प्रकप्ल बाधित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत विमानप्राधिकारणाने अजूनही अनेक आश्वासनाची पूर्तता … Read more

नायलॉन मांजामुळे गळा कापला

कोपरगाव : सोनारी येथील सुकदेव आघाव हे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धारणगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना चिनी बनावटीच्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात हा धोकादायक मांजा सर्रास विकला जात असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे. आघाव हे संजीवनी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ

कोपरगाव : आगामी वरसात पाच सहा महिन्यांनी राजकारणात उलथापालथ व्हईल. लक्ष्मीला पिडा राहील. ज्येष्ठामधी पाऊस पडलं. आषाढ महिन्यात पाऊस येणार नाय. कौर नक्षत्रात पाऊस पडल व पेरण्या व्हतिल. मनुष्याला पिडा राहील. चैत्र महिन्यात गारा पडतील. पिवळ्या धान्याला महागाई राहील. नदीनाल्यांना पूर येतील. जसा माझा आनंद केला तसा नगरीचा आनंद राहील, असे व्हईक तालुक्यातील भोजडे येथील … Read more

दोन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; मागितली ४० हजारांची लाच

कोपरगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये यासाठी ४० हजारांची लाच मागणारे शिर्डी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस शिपायांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद अशी आरोपींची नावे आहेत. कोपरगाव येथील सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान … Read more

सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात … Read more

राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता.  मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष … Read more

सलग चौथ्या दिवशीही शिर्डी विमानसेवा ठप्प!

काेपरगाव : ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे.  त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे. साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही. … Read more