बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याच्या वादातून बेदम मारहाण

कोपरगाव : बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास पाच जणांनी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ६ ला संजयनगरमध्ये घडली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात राहुल सोमनाथ गायकवाड (२० वर्षे) यांनी फिर्याद दिली. बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब फिर्यादीने विचारला असता अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, … Read more

आता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या दुष्काळानंतर सुरूवातीपासून आवश्यक वेळी पडलेल्या पावसामुळे यावेळी खरीपाचे पिके चांगली येणार, या अपेक्षेत असतानाच लांबलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मिळणारे उत्पन्न तर गेलेच परंतु, रब्बी पिकांच्या खर्चासाठीच्या तरतुदीचीही वाताहत झाली. अशा परिस्थितीत सरकार व सर्व समाजघटकांनी या लाखोंच्या पोशिंद्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने आता कोपरगाव तालुक्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर जीवघेणा हल्ला

कोपरगाव : शहरातील संजयनगर भागात एका तरुणावर पाच तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून पाचजणांविरूद्ध कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी शहरातील संजयनगर भागातील सोमनाथ संपत रोठे (वय २१) हा तरूण दि. ४ नोव्हेंबर … Read more

बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याचा जाब विचारल्याने भावाच्या डोक्यात पहार

कोपरगाव – शहरात संजयनगर भागात राहणारा तरुण राहुल सोमनाथ गायकवाड याच्या घरासमोर येवून त्याच्या बहिणीकडे पाहून आरोपीने शिट्टी वाजवली, तेव्हा शिट्टी का वाजवली असा जाब राहुल गायकवाड या तरुणाने विचारला असता त्याला ५ जणांनी बेदम मारहाण करत डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  जखमी राहुल … Read more

Live Updates :अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा अवघ्या 847 मतांनी विजय

कोपरगावात अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय झाला असून अवघ्या 847 मतांनी आशुतोष काळे विजयी झाले आहेत भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अनपेक्षित पराभव झाला. असून भाजप बंडखोर विजय वहाडणे व  विखेंचे मेव्हणे राजेश परजणे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. 1.28 :- तेराव्या फेरीत आशुतोष काळे 2040 मताने आघाडीवर … Read more

भारत-पाक सीमेवर शत्रूशी दोन हात करताना अहमदनगरचा जवान शहीद

अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.  कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.  लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच … Read more

कर्तव्यशून्य आमदारांना २१ तारखेला जागा दाखवून देऊ!

विरोधी पक्षाचे आमदार असताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळण – वळणाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र २०१४ नंतर गेल्या ५ वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तालुक्याच्या विद्यमान आमदार साधा भराव टाकू शकल्या नाही . यावरून त्यांना विकासाची किती आवड होती हे यातूनच दिसत आहे,  … Read more

गौप्यस्फोट ! शेतकऱ्यांचे पुणतांब्यातील आंदोलन आ. कोल्हेंनीच दडपले…

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा या गावातून सुरू झाले.  दरम्यान शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले हि अतिशय दुर्दैवी बाब असून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून कोपरगावला गतवैभव आशुतोष काळेच प्राप्त करून देऊ शकतात.  त्यासाठी २१ … Read more

आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवणारच !

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील पाच वर्षापासून आशुतोष काळे यांनी केलेला झुंजार संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेवून येण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून कोणत्याही परिस्थितीत आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवू, असा निर्धार वंचित … Read more

महिला तलाठीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव संगमनेर येथील गिरीश अशोक अभंग याने कोपरगाव येथे तलाठी असलेल्या पत्नीच्या बंगल्यावर १३ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी सोनाली भीमराव विधाते (माहेरचे नाव) हिच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  पत्नीच्या अनैतिक संबंधातून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद महेंद्र अशोक अभंग यांनी दिली. गिरीशचे सोनालीबरोबर … Read more

कोल्हेंच्या विजयाची मशाल पुन्हा रिक्षावालेच पेटविणार

कोपरगाव : या पंचवार्षिकला पुन्हा एकदा आ. स्नेहलता कोल्हे यांना आपण निवडून देऊ. पुन्हा एकदा क्रांतीची मशाल आपल्या हाती येणार आहे. पुन्हा एकदा विजयाची क्रांती होणार असून, ही क्रांती गोरगरीब रिक्षावाले व सामान्य जनताच करू शकते, असा विश्वास रिक्षा संघटनेचे संस्थापक जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी शनिवारी (दि. १२) रिक्षा संघटना सदस्य व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील … Read more

दहा वर्षात विकासाचा खडासुद्धा टाकला नाही-आ. कोल्हे

कोपरगाव : पुणतांबा परिसराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागेल. कारण पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही, असा आरोप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी पुणतांबा परिसरातील वाकडी व जळगाव येथे प्रचार सभेत माजी आमदार अशोक काळे यांच्यावर केला. … Read more

सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग

कोपरगाव : उच्चशिक्षित शांत, सरळ, संयमी व वेळप्रसंगी जनतेच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्व आशुतोष काळे यांच्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठांपासून ते युवा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे. आशुतोष काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी पुकारलेला ऐतिहासिक संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. ही दुर्दैवाची … Read more

हक्कासाठी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही : आशुतोष काळे

कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी … Read more

परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा

कोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष … Read more

मुख्यमंत्र्याच्या आदेशाने विखे पाटील संकटात

कोपरगाव – अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे यांना तुमच्या भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचक इशारा दिला आहे.  भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन  दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात … Read more

आमदार स्नेहलता कोल्हेंच्या वचनपूर्तीत खोटारडेपणा !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीची छाननी पार पडली असून सध्या रणांगण टीका टिप्पणीने गाजण्यास सुरूवात झाली आहे. त्यात प्रमुख लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून आशुतोष काळे व भाजप शिवसेना युतीच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे, नरेंद्र मोदी विचार मंचचे अपक्ष उमेदवार विद्यमान नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, ना. विखेंचे मेहुणे असलेले अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांच्यात आहे. यामध्ये तीन संस्थानिक … Read more

४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली !

कोपरगाव : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या मसुद्याच्या वेळी कोण आमदार होते? कायद्याच्या मंजुरीच्या वेळी सरकार कोणाचे होते? तेव्हा कोल्हे यांनी विरोध का केला नाही? मी तर विरोधातील आमदार होतो.  मागील वर्षीच्या दुष्काळात पोलीस बंदोबस्तात आपल्या बंधाऱ्यातील पाणी खाली सोडण्यात आले. त्यावेळी राज्यात व देशात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्या तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या. आपल्या … Read more