कोपरगावात कोल्हे गटाला पडले खिंडार !

कोपरगाव :- तालुक्याच्या दक्षिण भागातील बहादरपूर व अंजनापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहादरपूर गावातील कोल्हे गटाला मोठे भगदाड पाडून असंख्य युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये अंजनापूरचे भास्कर महाराज गव्हाणे, … Read more

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोपरगाव :- घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजी रस्ता भागात गुरूवारी घडली. या प्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शैलेंद्र राजेंद्र वाघ (बेट) असे संशयिताचे नाव आहे. सकाळी मुलगी घरात असताना आरोपी आला. त्याने समोर बसलेल्या आजीला माझ्याबद्दल विचारले. कसला आवाज येतो, म्हणून मी बाहेर येऊन बघितले … Read more

आमदार उदासीन असल्याने तालुका भकास : काळे

कोपरगाव :- शेजारच्या सर्व तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होतो. मात्र, कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असूनही दुष्काळाच्या यादीतून तो वगळला गेला. आमदारांना तालुक्याची वास्तव स्थिती मांडता आली नाही. अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र, कोपरगावची जनता अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेस पाणी जायकवाडीत वाहून गेले, पण गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र विकतचे पाणी घ्यावे लागले. … Read more

कोपरगावात कांद्याला ६३४० रुपये भाव

कोपरगाव | येथील बाजार समितीत डाळिंब व कांद्याचे लिलाव दररोज चालू आहेत. कांद्याचा खुला लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. शुक्रवारी कांद्याला क्विंटलला ६३४० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली. नंबर १ ला चार ते पाच हजार, गोल्टीला तीन ते साडेतीन हजार भाव … Read more

भाच्याकडून मामीचा विनयभंग

कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर … Read more

ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला !

कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला. हे केवळ २०१४ ला केलेल्या … Read more

अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही !

कोपरगांव ;- गेल्या पन्नास वर्षापासून दोन कुटुंबांच्या हातात गुरफटून पडलेल्या सत्तेला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील जनतेनेच आता पक्का निर्धार केला असून अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही, असा निश्चय जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी कोपरगांव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखविला. कोपरगांव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत सुरु करण्यात आलेल्या … Read more

पैशाच्या वादातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा ‘राडा’!

कोपरगाव :- शहरात नुकतेच नव्याने चालू झालेल्या सुदेश टॉकीज जवळील येवले अमृततूल्य चहाचे कोपरगाव शाखेचे संचालक संकेत गौराम मेंगडे (वय १८) यांना नितीन कोपरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पगारे रा. संजय नगर कोपरगाव व अनोळखी दोन इसमांनी आर्थिक कारणावरून बेदम मारहाण केल्याचा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संकेत गौराम … Read more

आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर येथील गरीब आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ही महिला पतीपासुन दोन लहान मुलांसह विभक्त राहाते. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील दत्तात्रय बादशहा वाळे (वय ५२) याने तीला ‘तुला एक गुंठा जागा देऊन घर बांधून देतो, तुझ्या लहान … Read more

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती … Read more

कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना … Read more

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  … Read more

लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार -राजेश परजणे

कोपरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आलेली कार्यकर्त्यांची बैठक गोदावरी दूध संघाबरोबरच दोन्ही साखर कारखान्यांच्या वार्षिक सभांमुळे तूर्त स्थगित ठेवण्यात आली असून, कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राजकीय दिशा आणि भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जि. प. सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले, कोपरगाव … Read more

#Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात?

कोपरगाव मतदारसंघात प्रत्येक विधानसभेची निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर लढली जाते. यंदाच्या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे या मैदानात असतीलच. परंतु प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे आशुतोष काळे असले तरी वहाडणेंची भूमिका महत्त्वाची ठरेल. नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभा लढवू शकतात त्यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबा अपेक्षित आहे.  कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर मध्यंतरी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे व … Read more

टेम्पोची धडक बसून एकजण जागीच ठार

कोपरगाव | आयशर टेम्पोची मोटारसायकलीला धडक बसून देविदास सुखदेव पवार (वय ५०, चाळीस खोल्या, येसगाव) यांचा मृत्यू झाला. मनीषा देविदास पवार ही जबर जखमी झाली. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी जावेद अजगर सय्यद (मिल्लतनगर, येवले, जि. नाशिक) याचा शोध पोलिस घेत आहेत. वाहन बेजाबदारपणे चालवल्याचा ठपका पोलिसांनी टेम्पोचालकावर ठेवला आहे. या … Read more

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोपरगाव :- विवाहितेचा मोटारसायकलीवरून पाठलाग करून तिच्या साडीचा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘तू माझ्या गाडीवर बसली नाही, तर वाईट परिणाम होतील,’ अशी धमकीही या तरूणाने दिली. या प्रकरणी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय ३२, श्रीकृष्ण मंदिर गल्ली, मुखेड, हल्ली मुक्काम अन्नपूर्णानगर,कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल … Read more