विभागात ३५ हजार ८४९ क्विंटल अन्नधान्य, ८ हजार ४६१ क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे, दि.8 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 845 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 696 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक … Read more

लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेले ४ हजार ३९३ जण रवाना

यवतमाळ, दि.8 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी पसरू नये तसेच या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे इतर राज्यातील, जिल्ह्यातील नागरिक, कामगार, विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडले. मात्र आता अडकेलेल्या नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली … Read more

सिमांत, लहान शेतकऱ्यांना मूळगावी आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यवतमाळ, दि.8 : जिल्ह्यात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप हंगाम आटोपताच बहुतांश शेतकरी रोजमजुरीकरीता मोठ्या शहरात स्थलांतर करतात. लॉकडाऊनमुळे हे शेतकरी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम त्यांच्या हातून जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सिमांत व लहान शेतकऱ्यांना (2 हेक्टरच्या आत शेती असलेले) मूळगावी परत आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना … Read more

केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार

मुंबई, दि. ८ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या … Read more

वकिलांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करा ‘या’ वकिलांची खंडपीठात याचिका !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- कोरोनामुळे वकिलांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी याचिका नेवासा येथील वकिलांनी केली आहे. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउनदरम्यान सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे वकिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वकिलांना कोणतेही आर्थिक संरक्षण नाही, तसेच पुढील सहा महिने तरी त्यांना पक्षकारांकडून फी … Read more

लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना रोजगार

भंडारा,दि. 8 :-महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली  लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून जिल्ह्यातील 50 हजार 339 मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींचा  सहभाग असून त्यापैकी 404 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु आहे. लॉकडाऊन काळातही मजुरांना  रोजगार मिळत आहे.  मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे … Read more

शिर्डी येथून विशेष रेल्वेने १४०२ वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रवाना

शिर्डी,दि.8: कोरोनाचा प्रादूर्भावा रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता आणि शिर्डी परिसरात नऊ वीट भट्टयांवर काम करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील 1402 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यामध्ये साकुरी येथील 437, राहाता येथील 218, पिंपळस येथील 98, पुणतांबा येथील 55, … Read more

कोरोना संकटामुळे ठप्प अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाचा अहवाल सादर

मुंबई, दि. 8 : कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ज्ञगटाच्या या अहवालात सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल व … Read more

६८६ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे नागभीडमध्ये दाखल

चंद्रपूर, दि. 8 मे: लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात अडकलेल्या चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील 686 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे आज सकाळी 9 वाजता नागभिड येथे पोहोचली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी याठिकाणी 25 एसटी बसेस उपलब्ध करून  या मजुरांना आपापल्या गावाकडे मोफत जाण्याची व्यवस्था केली. चंद्रपूर जिल्ह्यात … Read more

राज्यातील एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी ३,९४१ अनुज्ञप्ती सुरू

मुंबई, दि. ८ : राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (३ कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात … Read more

अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन ; उपनेते अनिल राठोड यांचा इशारा

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- ऐन उन्हाळातच उपनगर मधील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तसेच महापालिकेने वॉलमन वाढवणे गरजेचे आहे. यावर पालिकेने आठ दिवसात तोडगा काढावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला. तसे निवेदन मनपा … Read more

कोविड-१९ रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार – पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई, दि.०८ : कोविड-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स  जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार केला जाईल; यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. श्री.शेख यांनी मुंबईतील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व इतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद … Read more

वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून  यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more

पुणे जिल्ह्यात अडकलेले ४८० आदिवासी नागरिक पोहोचले आपल्या मूळगावी

मुंबई, दि. ८ : लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात अडकलेल्या ४८० आदिवासी नागरिकांना नंदुरबारमधील त्यांच्या मूळ इच्छित गावी पाठविण्यासाठी घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत प्रवासाची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या पुढाकाराने या स्थलांतरित आदिवासी नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाता आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील विविध … Read more

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी संपुर्ण जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केलेल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन कालात आपल्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी ई लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे यावर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिक्षा झाल्या … Read more

पुणे विभागातील ८३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 8:-पुणेविभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे.   तर ॲक्टीव्ह रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 2 … Read more

सोलापुरात नव्वद वर्षाचे आजोबा, एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

सोलापूर, दि. ८ : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत २९ रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे आजोबा तर एक वर्षाचे बाळही असल्याची माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे. डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलीगीकरण … Read more