मनपा कामगार युनियन बेमुदत धरणे आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या कामगारांचं वेतन आणि पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यशासन यासंदर्भात बेफिकीर आहे तर अहमदनगर महानगरपालिका उदासिनता दाखवित आहे, असा आरोप कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला आहे. दरम्यान लोखंडे यांनी यासंदर्भात महापौर बाबा वाकळे यांना एक निवेदन दिलं आहे. यामध्ये लोखंडे यांनी म्हटलंय, की कोरोनाच्या संकटात … Read more

स्थायी समितीच्या सभापतीने गुरुवारी बोलवली सभा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-महापालिका स्थायी समितीची सभापती अविनाश घुले यांनी गुरूवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थायी समिती सभागृहात सभा बोलावली आहे. सभापती पदी निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांची पहिलीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यानंतर आता ही दुसरी पण खर्‍या अर्थाने पहिली सभा होत आहे. घुले यांनी ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन … Read more

महापालिकेच्या तिजोरीत मार्च अखेरीस ५८ कोटी रुपये जमा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे करासह कर्ज वसुलीवरही परिणाम झाला. मात्र कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांनी महापालिकेचा कर भरला. थकीत करावरील शास्ती माफ केल्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मार्चअखेरीस ५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेने थकीत करावरील ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जाहीर केला होता. ही सवलत १५ डिसेंबर पर्यंत … Read more

महापालिकेचा ७०६ कोटींचा अर्थसंकल्प महासभेपुढे सादर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या ६८५ कोटीच्या अंदाजपत्रकात २१ कोटी ६५ लाखांच्या वाढीव तरतुदींची शिफारस करत एकूण ७०६ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी मंगळवारी (दि.३०) दुपारी महासभेपुढे सादर केले. महापौर वाकळे यांनी अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी नगरसेवकांना वेळ मिळावा म्हणून सभा तहकूब केली असून सभेचे नियमीत कामकाज आज … Read more

प्रादुर्भाव वाढताच मनपा आणखी दोन कोवीड सेंटर सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यने महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंगमध्ये कोवीड सेंटर सुरू केले. तेथे 210 बाधितांवर उपचार करता येणार आहे. आता महापालिकेने आणखी दोन ठिकाणी नव्याने कोवीड सेंटर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार घेणार्‍या बाधितांची संख्या दीड … Read more

आम्हाला पाणी द्या; अन्यथा त्यांच्या नळांमध्ये सिमेंट भरू!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही, तक्रार केल्यास पाणी येत नाही, तर नळ बंद करून टाका असे वॉलमन उत्तर देतो. महापौर, नगरसेवकाकडे तक्रार केल्यास काहीच काम होत नाही, मग २ हंडे पाण्यासाठी शेजारी गेल्यास भांडणे करावी लागतात. अशी अवस्था असताना महापालिका प्रशासन आमच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसात … Read more

स्थायी समितीच्या सभापदाची कमान राष्ट्रवादीच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असूनही गेली दोन वर्षे शिवसेना विरोधी बाकांवर आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आले असले तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादी-शिवसेनेचं मनोमिलन झालेलं नाही. याचाच प्रत्यय नगरमध्ये मनपाच्या स्थायी सभापदी पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही एकाकी पडलेल्या शिवसेनेने आज स्थायी समिती सभापतीच्या … Read more

मनपा सभापती निवडीच्या एक दिवस आधीच शिवसेनेत फाटाफूट

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- स्थायी समिती सभापतीची उद्या (गुरुवारी) 3 वाजता होणार्‍या विशेष सभेत निवड होणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला असून महापौर वाकळे यांच्या हजेरीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. तर शिवसेनेकडून विजय पठारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत फाटाफूट झाल्याचे समोर … Read more

अनोखे आंदोलन करत मनपाने बेशिस्तांचा बॅण्ड वाजविला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-नगर शहरातही गेल्या काही दिवसांत करोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. मात्र, अनेक नागरिक पुरेशी दक्षता घेताना दिसत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक भन्नाट आयडिया वापरली ज्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.यावेळी मनपाने कारवाई पथकासोबत बँड पथक पाठवून मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबपुष्प आणि मास्क देऊन गांधीगिरी केली. त्यातील कापडबाजार … Read more

सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींचा वेग वाढला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच चर्चा, बैठकांना जोर आला आहे. 4 मार्चला होणारी सभापती पदाची आणि जूनमध्ये होणार महापौर पदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच त्यावर चर्चा सुरू झाल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार की पुन्हा पहिली राष्ट्रवादी-भाजप युती कायम राहणार याकडे नगरकरांचे लक्ष … Read more

महापालिका नवे आयुक्त हजर झालेच नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून मनपा पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते मंगळवारी हजर होणार होते, परंतु काही कारणांमुळेे ते हजर झाले नाहीत. तत्कालीन आयुक्त मायकलवार ३१ डिसेंबरला निवृत्त झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राजेंद्र … Read more

मनपाची आर्थिक ऐपत नसल्याने खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-सिमेंट रोडवर डांबराचा थर टाकून रस्ता करण्याचं अजब काम नगरमध्ये सुरू आहे. पावसाळ्यात सिमेंटवरचं डांबर वाहून जाईल. त्याला जबाबदार कोण? संबंधित कामाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. शहरातील दिल्लीगेट ते नेप्ती चौक हा सिमेंटचा रस्ता असून तो ठिकठिकाणी … Read more

निवडणूक रणधुमाळी ! मनपा स्थायी समितीची सभापती निवडणूक तारीख जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पार पडली तोच जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूका पार पडल्या. दरम्यान आता नगर मनपाच्या स्थायी समितीची सभापती निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 4 … Read more

कोरोना फोफावतोय ! बंद केलेली कोरोना केंद्र मनपा पुन्हा सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. आजच्या … Read more

महापालिकेच्या आयुक्तपदी यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- महानगरपालिका आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास आणि या संदर्भात आदेश काढले असून त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी शंकर गोरे यांचा महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश निघाला आहे. तसा आदेश आज … Read more

महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची हकालपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे याची अखेर आस्थापना विभागातून हकालपट्टी करण्यात आली. सहायक आयुक्त राऊत यांच्याकडे या विभागाचा पदभार देण्यात आला. लहारे यांच्याविरोधात महिला कर्मचार्‍यांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी लहारे यांच्याबाबत … Read more

नागरी समस्यांबाबत हिंदुराष्ट्र सेना आक्रमक; मनपाला दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने मनापा उपयुक्त सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. शहराच्या कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सारडा गल्ली परिसरामध्ये अतिक्रमण करून शेकडो लोकांनी रस्त्यावरच वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. या अतिक्रणांमुळे बाजारपेठेतून चालणेही अशक्य झाले आहे. महिलांची छेडछाड, मंगळसूत्रांची चोरी, वाहतुकीची … Read more

‘हे’ आमदार म्हणतात ‘महापालिका हे आपले कुटुंब’

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या माध्यमातून मला दोनदा महापौरपद मिळाले. त्या माध्यमातून नगरकरांची सेवेची संधी मिळाली. या संधीच्या जोरावर नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारकीच्या पदावर विराजमान केले. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महापालिका ही आपल्या सर्वांची कुटुंब आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने सहावा व सातवा … Read more