महापौरांच्या गाडीवर कचरा फेकणार !

अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला … Read more

आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात होता, परंतु यावर्षी महापालिका प्रशासनाच्या उदासीनपणामुळे कुठलीही उपाययोजना झाली नसल्यामुळे नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत २ … Read more

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू … Read more

झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारा तो अधिकारी निलंबित

अहमदनगर :- ‘झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले आहेत. महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक खासगी Whatsapp ग्रुप आहे. या ग्रुपवर देशमुख यांनी वादग्रस्त पोस्ट टाकली. ‘उन्हाळ्यात एक झाड लावा, ते वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून एक क्वार्टर मिळवा’ अशी ही पोस्ट … Read more

स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत आहात, अशी टीका नगरसेवक रवींद्र बारस्कर, सतीश शिंदे यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात बारस्कर, शिंदे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका असताना जकात चोर नगरसेवक म्हणून प्रसिध्द होता. तुम्ही माया कशी … Read more

लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेत बदल होणार ?

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भेट घेतली असून या भेटीत महापालिकेत शिवसेना व भाजपची युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. लोकसभा निवडणूकीनंतर याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत सेना व भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असून त्या अनुषंगानेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख दिलीप … Read more

बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे आरोपी

अहमदनगर :- रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आता या गुन्ह्यात 18 आरोपी झाले आहेत. शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सहा जणांचा समावेश करण्यात आला. पोलिस … Read more

राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी !

अहमदनगर :- राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असतानाही, मनपा सभापती निवडणुकीत मात्र दोघांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली. ‘स्थायी’ सभापती निवडीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात बसपला मतदान केले. राष्ट्रवादी बडतर्फ गटाने अर्ज माघारी घेत बसपला साथ दिली. बसपचे मुदस्सर शेख यांनी शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांचा पराभव करीत सभापतीपदावर कब्जा केला. … Read more

शिवसेना पुन्हा सत्तेपासून दूर रहाणार ?

अहमदनगर :- शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापौर निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या बडतर्फ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता, पुन्हा तीच खेळी स्थायी समिती सभापती निवडणुकीत खेळण्याच्या हालचाली आहेत. या निवडणुकीत जर भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाला तर बडतर्फ गट कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरून वेळप्रसंगी भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे समजते. स्थायी समिती सभापती तसेच महिला-बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी … Read more

तर भाजप अल्पमतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचा पाठिंबा काढणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेथे शिवसेना आणि भाजप बरोबर पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केल्या असतील तेथे पाठिंबा काढून घ्या असे आदेश दिले आहेत. मनपात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला असला, तरी सत्तेत सहभाग घेतलेला नाही, पण राष्ट्रवादीने दिलेला आदेश बडतर्फ १८ नगरसेवक पाळून भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा करणार का ? यावर चर्चा सुरू झाली … Read more

महापौरांच्या निवडीला महिना उलटूनही स्थायीसाठी मुहूर्त मिळेना !

अहमदनगर :- अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काेणतीही करवाढ करायची असेल, तर १९ फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणे बंधनकारक असते. मात्र, अद्याप स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीला होणारा विलंब सर्वसामान्य नगरकरांच्या पथ्यावर पडणार आहे.स्थायी समितीबरोबरच स्वीकृत सदस्य निवडीचाही विषय प्रलंबित आहे. पहिल्या महासभेतच … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब !

अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना बजावून कारवाईचा इशारा दिला होता. खुलासा गायब झाला की गायब केला ? त्यानुसार नगरसेवकांनी खुलासाही पाठवला होता, तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांनी खुलासा न दिल्याचे कारण पुढे करत … Read more

मनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित ?

अहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून थकविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महावितरणद्वारे मनपाला नोटीस बजावून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. थकबाकी १७९ कोटींवर पोहचली ! महापालिकेच्या पाणी योजनेची थकबाकी १७९ कोटींवर पोहचली असून शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने मनपाला जुन्या थकबाकीचे हप्ते करुन दिले … Read more

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. …तर हा हल्ला झाला नसता   या निवेदनात … Read more

लवकरच नगरला ३०० कोटी मिळणार !

  अहमदनगर – सरकार महापौरांच्या पाठीशी असून मनपाला ३०० कोटी देणार आहोत. नगरला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ३६ मतदारसंघांत दौरे केले आहेत. बुथस्तरापासून संघटन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आम्ही जेथे शब्द दिले ते पाळले आहेत.शुक्रवारी … Read more

मनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात !

परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत.