कब्बडी खेळायला नकार दिल्याने, ब्लेडने वार करत मारहाण

खामगांव –  फुलंब्री तालुक्यातील जळगांव मेटे मित्राने कब्बडी खेळाण्यासाठी नकार मिळाल्यामुळे एकाने रागात येऊन ब्लेडने वार केल्याची घटना सोमवार (दि.११) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.  जळगाव मेटे येथील रामेश्वर काळुबा मेटे(२३) दि. ११ रोजी रात्री ८ः३० सुमारास ग्रामपंचायत कार्यलयाजवळ मित्रासोबत होता. तेथे आरोपी नवनाथ प्रकाश मेटे हा आला व त्यांने रामेश्वर काळुबा मेटे यास कब्बडी … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या

डोंबिवली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी पोलिसानी या तरुणाला अटक केली आहे. दीपक भणगे असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पूर्व येथील सुनील नगर परिसरातील जय मल्हार सोसायटीत राहतो. तर हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव ऐश्वर्या देशपांडे ( १९ ) असे असून … Read more

‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढले, आता ‘महाराष्ट्र सेवक’!

मुंबई –  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आता संपलेली आहे. ते आता माजी माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचं ट्विवटर हँडलवरच्या त्यांच्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ सा उल्लेख केलाय. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या … Read more

…त्यांच्या हट्टामूळेच आज राज्यात राष्ट्रपती राजवट!

मुंबई : राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही केवळ कोणाचा तरी हट्ट, आग्रहामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याची खरमरीत टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  असे असले तरी भाजपा राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सध्या तरी भाजपाची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम असून भाजपा योग्य वेळी आपली भूमिका जाहीर … Read more

राष्ट्रपती राजवट राज्यावर ओढवणे हे अतिशय दुर्दैवी

मुंबई : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.  मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे त्यांनी … Read more

तब्बल दीड कोटींचे सोने घेऊन दोन कारागीर भाऊ पसार

उल्हासनगर : तीन सोनारांनी सोने घडणावळीकरता दिलेले ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची घटना उल्हास नगरमध्ये घडली. त्याची किंमत सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये असल्याचे समजते. उल्हासनगरातील कॅम्प नं. २ येथील सोनार गल्लीत पश्चिम बंगाल येथील विश्वजीत डे व सुजीत डे या दोन भावांचे सोने घडणावळीचे दुकान … Read more

राज्यात लवकरच थंडीचे आगमन !

पुणे :-  सलग निर्माण झालेली चक्रीवादळे आणि कमी दाबाचे क्षेत्र यांच्या प्रभावामुळे राज्याने यंदा सुमारे पाच महिन्यांचा पावसाळा अनुभवला. एरवी गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी यंदा पावसात भिजली. त्यानंतरही वातावरण ढगाळच राहिले. आता मात्र हवामान निवळले असून राज्यात सगळीकडे थंडीची सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि … Read more

माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाका… अशी चिठ्ठी लिहून पेंटरची आत्महत्या

जळगाव :- माझ्या मृत्यूस मीच कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावे, अशी चिठ्ठी लिहून पेंटरने हरिविठ्ठलनगरातील स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाने मृतदेह बघितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. राजेश हिंमत मकवाना (४०, भटवाड्याजवळ हरिविठ्ठलनगर) असे मृत पेंटरचे नाव आहे. ते पेंटिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी … Read more

धक्कादायक! सहा महिन्यांच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

वैजापूर- तालुक्यातील माळी घोगरगाव येथील बेपत्ता असलेल्या विवाहितेने सहा महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.९) सकाळी समोर आली. मायलेकी शुक्रवारपासून घरातून बेपत्ता होत्या. राणी भगवान जगधने (२१) व वैष्णवी भगवान जगधने (६ महिने) अशी या मायलेकींची नावे आहेत. वीरगाव पोलिसांनी सांगितले, की भगवान जगधने यांची पत्नी राणी व मुलगी वैष्णवी शुक्रवारी … Read more

मालकीनेने केला दागिने चोरीचा आळ, असह्य झालेल्या महिलेने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

परळी – धुणीभांडी करून घर चालविणाऱ्या एका महिलेला दागिने चोरीचा आळ असह्य झाला. चौकशीसाठी पोलीसही घरी येऊन गेल्याने धास्तावलेल्या महिलेने विषारी द्रव प्राशन करुन शनिवारी (दि.९) आत्महत्या केली.  दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करुन मयत महिलेचा मृतदेह शहर पोलीस ठाण्यासमोर नेला. छबूबाई नारायण पाचमासे (५०, रा.परळी) असे … Read more

‘त्या’ प्रकरणी सोनी टीव्ही पाठोपाठ अमिताभ बच्चन यांनीही मागितली माफी

मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनाखाली सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) सीझन ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर केल्याप्रकरणी शनिवारी बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली.  केबीसीच्या ६ नोव्हेंबरच्या भागामध्ये शहेदा चंद्रन या स्पर्धकाला असा प्रश्न विचारण्यात आला की, यापैकी कोणते राज्यकर्ते मोगल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील आहेत. पर्याय असे दिले होते … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने बीयरच्या बाटलीने सख्ख्या भावाची हत्या,तीन वर्षानंतर असा सापडला आरोपी..

मुंबई : दारूसाठी सख्ख्या मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भावाला गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पोलिसांनी तीन वर्षांनंतर अटक केली आहे. विजय लक्ष्मण मानुस्करे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून तो घणसोली, नवी मुंबईत राहत होता.  गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस नायक हृदयनारायण मिश्रा यांना एका विश्वसनीय बातमीदाराने खबर दिली की, २०१६ मध्ये सिद्धिविनायक टिटवाळा येथे राहणाऱ्या … Read more

भाजपा फोडाफोडीचे राजकारण करू शकते!

ठाणे : गोवा, कर्नाटक, मणिपूर या ठिकाणी भाजपाचे कमी आमदार निवडून आले असतानाही आमदारांची तोडफोड करून भाजपाने सरकार स्थापन केले, ही भाजपाची नीती.  त्यामुळे महाराष्ट्रातही आमदारांचा घोडेबाजार होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी प्रभारी आणि प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी भाजपाच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. भाजपा सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी … Read more

थोडीशी वाट बघा, राज्यात राम राज्यच येणार – गिरीश महाजन

नाशिक – नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिरात जय श्री रामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. महाजन याप्रसंगी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात राम राज्यच येणार आहे, थोडा धीर धरा वाट बघा असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणाले. ते … Read more

लग्नाच्या बस्त्यासाठी जात असताना उपवराचा रेल्वे रुळात पाय अडकून जागीच मृत्यू

जळगाव – नुकतेच लग्न ठरले असल्याने लग्नाच्या बस्त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेल्या नशिराबादच्या तरुणाचा रेल्वे रुळामध्ये पाय अडकल्याने धावत्या रेल्वेखाली येवून मृत्यू झाला.  ही घटना गरुवारी सायंकाळी असोदा रेल्वे स्थानकाजवळ घडली. अक्षय श्यामसुंदर मोरे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी तरुणाच्या लग्नाचा बस्ता जळगाव येथे भरण्याचे ठरले हाेते. त्यानमित्त ताे भादली येथून आत्याला आणण्यासाठी दुचाकीवर … Read more

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून आईनेही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

केज –दोन महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून एका २८ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली.  शिवकन्या सोमेश्वर रत्नपारखी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. युसूफवडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.  बनसारोळा येथील रामभाऊ सुवर्णकार यांची कन्या शिवकन्या हिचा पाच वर्षांपूर्वी भुईसमुद्र (जि. लातूर) येथील सोमेश्वर रत्नपारखी यांच्यासोबत विवाह झाला होता.  तिला … Read more

मुलगा होत नसल्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळले, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

नांदेड – किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात दि.९ डिसेंबर १६ रोजी मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी सत्यव्रत गारौले (४२) याने पत्नीला रॉकेल अंगावर टाकून तिला पेटून दिले होते.  यावर आरोपीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी शुक्रवारी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सविस्तर माहिती अशी की, किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात सत्यव्रत गारौले व … Read more

पंढरपुरात भगर खाल्ल्याने 60 वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपूर –  भगर खाल्ल्याने 50 ते 60 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे.हे सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  येथील असून त्यांच्यावर  पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  कार्तिकी यात्रेच्या  एकादशीसाठी पंढरपूरला आले असल्याने उपवास असणाऱ्यांनी ही भगर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याची माहिती मिळते आहे.   ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.रात्री अडीच वाजण्याच्या … Read more