श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी : आमदार लहू कानडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूरमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक सर्व बाबी, शासकीय कार्यालये असून शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या कल्याणासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत केली. हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते गुरुवारी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आकारमानाने सर्वात मोठ्या … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार – आ. कानडे

श्रीरामपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी मला साथ दिली आणि त्याला मतदारराजानेदेखील पसंती दिली. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मी मतदारसंघात कामे करणार आहे.  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देऊ, असे श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांनी सांगितले. आमदार कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शनिवारपासून आपला दौरा सुरू केला. … Read more

स्वतःचा रस्ताही त्यांना दुरुस्त करता आला नाही… ते मतदारसंघाचा काय विकास करणार ?

श्रीरामपूर :- तालुक्याचे प्रश्न सोडवायला आमदार भाऊसाहेब कांबळेच हवेत, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणताच कांबळे याना स्वतःच्या घरचा रस्ताही दुरूस्त करता आला नाही, अशी टीका अनिल कांबळे यांनी केली.  श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार भाऊसाहेब कांबळे हवेत, असे आवाहन मुरकुटे यांनी करताच स्वतःच्या घराकडे जाणारा गोंधवणी रस्तादेखील त्यांना गेल्या … Read more

आघाडीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारातून आदिक गायब

श्रीरामपूर: तालुक्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून कोण कोणाच्या बाजूने हेच कळेनासे झाले.  त्यात नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आघाडीच्या बाजूने समर्थन करतील म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांचा प्रचार करतील असे चित्र दिसत असतांना उमेदवार लहू कानडे यांच्या एकही प्रचार सभेला व बैठकीला नगराध्यक्षा अनुराधा आदिक व … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट श्रीरामपूर मतदारसंघ

श्रीरामपूरची निवडणूक रंगतदार वळणावर एकेकाळी देशातील साखरेची बाजारपेठ अशी ओळख असलेलं श्रीरामपूर सध्या बकाल झालं आहे. उत्तर नगर जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून या शहराकडं पाहिलं जात होतं; परंतु आता शहराचं वैभव लयाला गेलं आहे. सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी संस्था लयाला गेल्यानं ही अवस्था झाली आहे. ज्येष्ठांच्या निवासाचं शहर म्हणून आता त्याची ओळख व्हायला लागली आहे. … Read more