सर्वसामान्य जनतेच्या लोकनेत्या: आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव -पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या पाच वषांर्त मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे ज़नतेने त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून देऊन पाच वर्षे ज़नतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. दोन्ही तालुक्यांतील जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास आमदार राजळे यांनी विकासकामांतून सार्थ ठरवला आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य ज़नतेच्या लोकनेत्या व कार्यसम्राट आमदार … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगांव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या लेखाशीर्ष 2515 तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना या सारख्या लोकाभिमुख योजनांना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात … Read more

नव्या सरकारामुळे आमदार मोनिका राजळेही झाल्या चकीत….

पाथर्डी |धक्कादायक व अनपेक्षित बातमीने पाथर्डी तालुका झोपेतून जागा झाला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या शपथविधीने सर्वांनाच चकीत केले. आमदार मोनिका राजळे यांनाही शपथविधीबाबत काहीच कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांचा कल पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले. ‘मी पुन्हा येणार’ अशी ग्वाही … Read more

ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.  भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

…म्हणून घड्याळाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली!

पाथर्डी – निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.  परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न … Read more

पंकजा मुंडे व माझ्यात मतभेद नाहीत : आ. राजळे

पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही. पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

आमदार मोनिका राजळे कोट्यधीश पण एकही चारचाकी वाहन नाही !

शेवगाव ; – आमदार मोनिका राजळे कोट्यधीश असून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी आपल्या कुटुंबाकडे नऊ कोटी 28 लाख 86 हजार 178 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. आ. मोनिका राजळे यांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही, तर त्यांचे पती स्व. राजीव … Read more

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे घेणार आ.मोनिका राजळेंसाठी सभा

पाथर्डी : ‘निवडणूक प्रचारकाळात मी तुमच्या प्रचारासाठी नक्कीच सभा घेईल,’ असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांना दिले.  विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच काही राजळे विरोधकांनी पंकजा मुंडे यांची भेट घेत, राजळे यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नका, असे साकडे मुंडे यांना घेतले होते. या विषयावर अनेक बैठका व मेळावे घेत राजळे … Read more

आमदार मोनिका राजळे एकदा तुमचा सात-बारा तपासून बघा !

शेवगाव : भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर मोनिका राजळे यांनी खड्यासारखे वेचून बाहेर काढले व स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची लाभाची पदे दिली. भाजपचे निष्ठावान असे प्रमाणपत्र तुम्ही देण्याची गरज नाही. एकदा तुमचा सात-बारा व फेरफार तपासून बघा, म्हणजे कोण निष्ठावान हे जनताच ठरवेल, अशी टीका ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी … Read more

‘आ. राजळेंनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये’ !

पाथर्डी :- आमदार मोनिका राजळे यांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये, असे प्रतिपादन भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे यांनी केले. आ. राजळे यांनी तालुक्यात गावागावात केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध करून पत्रके वाटली. या यादीमध्ये भगूर येथील दोन विकासकामांचा उल्लेख आहे; परंतू भगूर येथे झालेली विकासकामे जि. प. जनसुविधा व समाजकल्याण विभागांतर्गत झालेली असून, ही कामे … Read more

आ.राजळे यांचा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर !

शेवगाव :- जलसंधारणसह रस्ते विकास व इतर कामांकरिता आमदार मोनिकाताई राजळे यांनी शासनाच्या विविध योजनेतून विकासकामाला भरीव निधी देण्याचे काम केले. अल्पावधीत शेवगाव पाथर्डी मतदार संघातील विकासाची गती वाढवुन विकास कामाचा डोंगर उभा केला. तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात सर्वाधिक विकास कामे झाल्याने हा संपूर्ण परिसर जात, पात, धर्म भेद विसरून आमदार राजळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा … Read more

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यात … Read more

विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले, पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू … Read more

आ. कर्डिलेंना आ. राजळेंचे पाठबळ !

नगर दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अंतर्गत पुन्हा एकदा नव्याने फेर जुळण्याचे प्रयत्न होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याभोवती भाजपचे राजकारण आगामी काळात फिरण्याची चिन्हे आहेत. भाजपासह सत्तेचे प्रमुख शक्तीकेंद्र बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महाजनादेश यात्रेच्यानिमिताने पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांनी आ. कर्डिले यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले. या कौतुकामागील … Read more

लोकसभेसाठी मोनिका राजळेचां खा. दिलीप गांधीना पाठिंबा.

पाथर्डी :- ताई, तुम्हाला लोकसभेसाठी शुभेच्छा मतदारांमध्ये तुमची इमेज खूप चांगली आहे. लोकसभा, विधानसभा सगळीकडे वातावरण चांगले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पालवे म्हणताच आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभेची इच्छा नाही, मी आहे तेथेच बरी आहे. राजकारणात मी नवीन आहे, अजून शिकू द्या, असे सांगत लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत नसल्याचे सांगत विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची … Read more

मतदारसंघात सव्वा कोटीची कामे पूर्ण : आ.मोनिका राजळे.

पाथर्डी :- विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी विविध गावांत मिळून सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली. सर्वांचे योगदान लाभल्यास कामाची गती वाढण्यास मदत होते, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. कसबा भागातील मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी अल्पसंख्याक निधीतून दहा लाख खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या.