पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही.
पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी तालुक्यातील वंजारी मतदारांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा प्रारंभ आमदार राजळे यांनी शहरातील श्रीक्षेत्र खोलेश्वर देवस्थान येथे पूजा करून केला.
यावेळी भाजपचे विस्तारक दिनकर गर्जे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नंदकुमार मोरे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाठ,
उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, काशिनाथ लवांडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे, रासपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे,गजानन कोष्टी आदी उपस्थित होते.
- Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला 50MP सेल्फी कॅमेरा असलेला आणखी एक नवीन फोन, मिळतील अनेक खास फीचर्स!
- Ahmednagar News : नगरकरांची साडेचारशे किमीवरून येणाऱ्या ‘देवगड हापूस’ला सर्वाधिक पसंती ! भावही तेजीत, पायरीसह केशरालाही डिमांड
- Bhagini Nivedita Sahakari Bank : पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेत निघाली भरती…
- Ahmednagar Politics : लोकसभेच्या प्रचारात कांदाभावाची फोडणी ! दोन्ही बाजूच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रचारात करावा लागतोय रोषाचा सामना
- SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमधील SNJB येथे विविध पदांसाठी निघाल्या जागा, अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!