भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदी

अहमदनगर ;- भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशातील युवकांना नोकर्‍या तर मिळाल्या नसून, आहे त्या नोकर्‍या देखील धोक्यात आल्या आहेत. शाश्‍वत विकासाचा पर्याय राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांना दिसत आहे. अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राष्ट्रवादीत नेहमीच न्याय व सन्मान देण्याचे काम करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली

पारनेर ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय. हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्‍यात संघर्ष करावा लागेल. झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्‍यात राजकीय भूकंप … Read more

राष्ट्रवादीकडून छावणीचे बिल देण्याची मागणी

नगर :- शासनाने चारा छावणी चालू ठेवण्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी छावणी चालकांचे बाकी असलेले बिल दोन ते तीन दिवसांत अदा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी नगर श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दादा … Read more

राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे. येत्या १ जुलैपर्यंत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात वा जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारी मागणीचे अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे पक्षाचे … Read more

संग्राम जगताप यांच्यासाठी राज ठाकरे अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे. त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या … Read more

आ.संग्राम जगतापांच्या प्रचारार्थ आज धनंजय मुंडेंची नगरमध्ये सभा

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तरेतील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता जुना बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार रॅलीस सुरुवात होईल. नगर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली जाणार असून कलेक्टर कचेरी येथे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत. … Read more

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी हितगुज केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीतील स्थिती, एकूण मतदान, सध्याचे वातावरण अशा गुजगोष्टी करत लोकसभा निवडणुकीचा संग्राम जिंकण्यासाठी आघाडीचा धर्म … Read more

सोमवारी शरद पवार नगरमध्ये.

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारी (२५ मार्च) सायंकाळी नगरला मुक्कामी येत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासमेवत असतील. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जो आत्मविश्वास उंचावला आहे, तो खरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे वळसे म्हणाले. समन्वय समितीची बैठक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समन्वय समितीची बैठक होईल. आघाडीच्या … Read more

मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

अहमदनगर :- अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा घणाघात करत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडेना धारेवर धरले. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.

अहमदनगर :- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील हे मंगळवारी दि. २२ दुपारी चार वाजता नगरमध्ये येणार असून , त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन,अहमदनगर येथे अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब !

अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना बजावून कारवाईचा इशारा दिला होता. खुलासा गायब झाला की गायब केला ? त्यानुसार नगरसेवकांनी खुलासाही पाठवला होता, तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांनी खुलासा न दिल्याचे कारण पुढे करत … Read more

आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत !

अहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. राजकीय अडचणी वाढल्या ! विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांसमोरील राजकीय अडचणी … Read more

शहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शहरात स्मारक होण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले. वाकळे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा रेखा जरे पाटील, सुरेश बनसोडे, … Read more

स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून सावित्रीबाईंनी क्रांती घडवली -आ.संग्राम जगताप

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रजनी भिमराव जाधव यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. भिंगार येथील भिमागौतमी विद्यार्थिनी आश्रममध्ये मुलींच्या जडण-घडणीत महत्त्वाची भुमिका बजावत, निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाबद्दल आश्रमाच्या अधिक्षिका असलेल्या रजनी जाधव यांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस … Read more