आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे

पारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. राममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च … Read more

‘त्यांच्या’ बरोबर उघड फिरणारे आतून माझे काम करत होते – आ. लंके

पारनेर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असलो पारनेर व नगर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षनिष्ठा सोडून एक व्यक्ती म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहिल्याने मोठया मताधिक्याने माझा विज़य झाला, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.  रविवारी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. निवडणुकीच्या … Read more

आदिवासी व धनगर बांधवांचे प्रश्न सोडवू :आ. निलेश लंके

पारनेर :- तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील वाड्या- वस्त्यांवर राहणारे आदिवासी तसेच धनगरबांधवांसह इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आदमार नीलेंश लंके यांनी दिले. ढवळपुरी (ता. पारनेर) येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कारप्रसंगी आ. लंके बोलत होते. आ. लंके पुढे म्हणाले, जनतेच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी या समाजातील बेरोजगार व महिलांचे विविध प्रश्न तसेच घरकुल … Read more

येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध – आ. लंके

पारनेर –मतदारसंघातील शेतीचे व्यापक प्रश्न, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. मांडवे खुर्द येथे मोठे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल आमदार लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची … Read more

आ. लंकेच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पारनेर –नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ४ कोटी ७७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे निवडणुकीपूर्वी काही महिने आगोदर या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानही नागरिकांनी … Read more

वाळूचोरांनी पोलिसांना धक्काबुक्की करत वाळूचा डंपर पळवला!

पारनेर – तालुक्यातील कामटवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी पोलिसांना धक्काबुक्की करून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवून नेल्याची घटना घडली.  याप्रकरणी दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा, तसेच वाळूचोरीप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळशी गावाकडून वाळूने भरलेला डंपर खडकवाडीकडे येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे … Read more

हंगा तलाव ओव्हरफ्लो, पारनेरची तहान भागली !

पारनेर–पारनेर शहर, तसेच हंगा, लोणी हवेली या गावांची तहान भागवणारा हंगा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी पहाटे चार वाजता तो ओव्हरफ्लो झाल्याची माहिती शाखा अभियंता अजिनाथ मोहळकर यांनी दिली. गेल्या दुष्काळात ७० हजार घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने यंदा पाणीसाठ्यात सुमारे ४ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. १९८५ मध्ये बांधून पूर्ण झालेल्या या … Read more

स्वत:च्याच गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून तरुणाची आत्महत्या

नगर – स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पारनेर तालुक्यातील पळवे बु. हॉटेल जयराम येथे घडली.   हॉटेल जयराम येथील हॉटेलच्या खोलीत खोलीचा दरवाजा आतून बंद करुन देवचंद सुमेर रमोला वय ३० वर्ष, रा. उत्तरकाशी उत्तराखंड, हल्ली रा. हॉटेल जयराम या तरुणाने स्वत: च्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळा कापून  कापून … Read more

शिवसेनेचा बहिष्कार ग्राह्य धरू नये : खा. विखे

पारनेर : पारनेर तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने टाकलेला बहिष्कार हा अधिकृत नसल्याने तो ग्राह्य धरू नये, अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. विखे यांच्या तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने बहिष्कार टाकला होता, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली असता, शिवसेनेचा बहिष्कार अधिकृत पत्रानुसार नसल्याने ग्राह्य धरू नये तसेच शिवसेनेने पदाधिकारी हे एक तर … Read more

नुकसानग्रस्तांना महिना अखेर पर्यंत भरपाई दिली जाणार – खा. विखे

टाकळी ढोकेश्वर: चालू नोव्हेंबर महिन्याच्या आत पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानासह रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन खा. डॉ. सुज़य विखे यांनी शेतकऱ्यांना दिले. अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी खा. विखे हे पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खा. विखे यांनी तालुक्यातील भाळवणी, वासुंदे, कर्जुले हर्या येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली, या वेळी … Read more

पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप !

पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल … Read more

खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील वाहन दरीत कोसळले

पारनेर : खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली. या अपघातात चालक पो. कॉ. पोपट मोकाते यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.  तर या अपघातात … Read more

पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबार घेण्याचा संकल्प – आ. निलेश लंके

पारनेर : अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांवर बोट न ठेवता सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.  शासनमान्य दुकाने, शिधापत्रिका व इतर सोयीसुविधांविषयी माहिती घेत सर्वसामान्य लोकांचे हेलपाटे कमी करावेत, अशीही मागणी … Read more

कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या

पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले. यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ.निलेश लंके

पारनेर :- सत्ता उपभोगण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला जनतेने सेवक म्हणून निवडून दिले आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. पारनेरचे नवनिर्वाचित आमदार लंके यांचा घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश … Read more

कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने चिमुकलीला चिरडले

अहमदनगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.  माधुरी बाबाजी भोसले असे या मृत चिमुकलीचे नाव असून. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  मिळालेल्या माहितीवरून … Read more

भाजप-सेनेतील वादाबाबत आण्णा हजारे म्हणतात…

पारनेर :- राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली. राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप व सेनेेमध्ये एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत तर त्यांनी गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? याचा अर्थ … Read more

मोटारसायकल घसरल्याने आमदार नीलेश लंके जखमी

Nilesh Lanke

पारनेर | मोटारसायकल घसरल्याने आमदार नीलेश लंके किरकोळ जखमी झाले. त्यांनी मंगळवारी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून घेतले. आमदार झालो, तरी आपण सामान्य कुटुंबातीलच आहोत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. सोमवारी मतमोजणी सुरू होती, त्यावेळी लंके हे आपल्या घरीच होते. मतांची आघाडी वाढत असल्याने कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर ते मोटारसायकलीवरून सुप्याला निघाले. काही … Read more