पैशाची मागणी करते म्हणून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरास अटक

पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे काल ता.28 रोजी सायंकाळी ही घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद सुरेश ढवण रा .कोहकडी ता. पारनेर यास अवघ्या बारा तासात जेरबंद केले. … Read more

विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या

पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. गव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत. मृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या … Read more

कॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

पारनेर ;- कॉलेजच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या आणि नकार मिळूनही तिचा पाठलाग करणार्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे,तरुणीच्या तक्रारी नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुणास अटक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वडनेर भागात राहणा-या एका १६ वर्ष वयाच्या कॉलेज विद्यार्थिनीचा बोलेरो जीपमधून वेळोवेळी इच्छा नसताना पाठलाग करुन मोबाईलवर फोन करुन … Read more

गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथे ३२ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास शेटीबा भोसले (वय ३२ वर्षे), रा. पोखरी (पवळदरा) या विवाहित तरुणाने घरातील खिडकीच्या लोखंडी अंगलच्या गजास सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. घटनेच्या अगोदर रामदासची … Read more

जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो – सुजित झावरे

पारनेर :- विकास कामांबाबत आपण कोणाशीही स्पर्धा करत नाही. जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले. भाळवणी ते भांडगाव रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमा ते बोलत होते. यावेळी सरपंच अशोक खरमाळे, श्याम खरमाळे, बबन पवार, सरूदास भुजबळ, पोपट शिंदे, योगेश … Read more

सख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू

पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी … Read more

वृद्ध जोडप्यास हातपाय बांधून, तोंडात बोळे कोंबून, चाकूचा धाक दाखवून लुटले

पारनेर :- तालुक्यातील डोंगरवाडी काटकवेड येथे राहणारे जनार्दन डोंगरे व त्यांच्या पत्नी सो, सीताबाई जनार्दन डोंगरे या वृद्ध दाम्पत्याकडे काल दुपारी ३. १५ च्या सुमारास भरदिवसा चार अनोळखी चोरटे घरी आले व त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन पाणी मागत घरात घुसले. चौघा आरोपींनी वृद्ध सीताबाई  जनार्दन डोंगरे, वय ७० व त्यांचे  पती जनार्दन डोंगरे या दोघांचे … Read more

एसटीच्या वर्धापनदिनालाच पारनेर एसटी आगारात मारामाऱ्या !

पारनेर :- एसटीच्या वर्धापनदिनीच आगारातील एका सुरक्षा रक्षकाने आगारात मोटारसायकल नेण्यासाठी मज्जाव केल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी पारनेर आगारात घडला.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर एसटी आगारात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी नवनाथ व्यवहारे हा चालला असताना सुरक्षारक्षक रामचंद्र तराळ यांनी त्यास मोटारसायकल आत नेण्यास विरोध केला.  … Read more

पाण्याच्या टाकीमध्ये पडुन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पारनेर :- तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथील तन्मय धोंडीभाऊ सुंबे वय 9 वर्षे, या बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत सविस्तर माहिती अशी की तन्मय सुंबे हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. गोरेगाव येथील मंथन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता तिसरीचे शिक्षण घेऊन तो चौथी इयत्ता मध्ये गेला होता. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह लावणाऱ्या आई – वडिलावर गुन्हा

पारनेर  –  तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई – वडील व मुलांकडच्यांनी विवाह लावला. याप्रकरणी काल मुलीचे वृद्ध नातेवाईक विश्न शिवराम गवळी , वय ६८, रा. अपधूप , ता. पारनेर यांच्या … Read more

संतापजनक : पारनेर मध्ये नराधम आजोबाने केला १६ वर्षीय नातीवर अत्याचार,डॉक्टरांकडे नेल्यावर नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड !

पारनेर :- नगर जिल्ह्यात पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील पोखरी मध्ये स्वताच्या १६ वर्षीय अल्पवयीन नातीवर आजोबा व नातवाने गेल्या वर्षी अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. पोखरी येथील संबंधित आजोबा व नातवाच्या विरोधात पारेनर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या दोघांना अटक केली … Read more

विखे कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले !

पारनेर :- विखे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे सत्तर कोटी थकवले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू व प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला. राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील संस्थांत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात डॉ. अशोक विखे साेमवारपासून लोणी येथे उपोषणास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अर्धा … Read more

धक्कादायक : पित्याने नव्हे तर नराधम पतीनेच तिला अंगावर पेट्रोल ओतून मारले ? पारनेर तालुक्यातील निघोज प्रकरणाला वेगळेच वळण…

अहमदनगर :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलींग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे.  अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन … Read more

डॉ सुजय विखेंची उमेदवारी जनतेची

पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे. विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले. त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे … Read more

सात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.

पारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने … Read more

सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ !

अहमदनगर :- लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास … Read more

लग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या !

पारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत. येत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पारनेर :- तालुक्यात एका 17 वर्षिय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. फसवणूक झाल्याने मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण पोपट खरात (वय 24, रा. कारेगाव,ता.पारनेर) याच्याविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला जेरबंद केले आहे. पारनेर तालुक्यातील कारेगाव येथील … Read more