मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नांनी ‘त्या’ देवस्थानला निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील श्रीक्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासनाकडून काही निधी प्रलंबित राहिल्यामुळे येथील विविध विकास कामे रखडली होती. परंतु येथील ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेला निधी पुन्हा एकदा संबंधित विभागाकडे वर्ग झाला आहे. लवकरच उर्वरित कामे देखील … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस राहणार बंद!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील  मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस बंद राहणार आहे. कोरोना साथ रोगाची वाढते प्रमाण व  बाधितांंची संख्या लक्षात घेता  खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवस्थान समितीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने हा घेतल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी दिली . … Read more

हे काय ! राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू करण्यासाठी स्वतःला घेतले कोंडून 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- आजवर आपण विविध आंदोलने आपण पहिले आहेत.मात्र पाथर्डी तालुक्यात  स्वतःला कोंडून घेऊन एक आगळं वेगळं आंदोलन केले. कारण होते रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय … Read more

अरेरे! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील उद्धव कानिफनाथ शेळके (वय २५) या तरुणाने कासार पिंपळगाव हद्दीतील नगर शेवगाव रोड वरील फॉरेस्ट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. साधारणपणे दुपारी ही घटना घडली. सायंकाळी गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी सदर घटनेची खबर मोबाईल वरून सर्वत्र पसरवल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या तरुणाच्या … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. राजळेंकडून दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  शनिवारी दुपारी (दि.२०) रोजी शेवगाव तालुक्यातील आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, लाडजळगाव, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे या गावांत गारपीट होऊन शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज सोमवारी पाहाणी करत हतबल शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले. तसेच … Read more

जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवेळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी संकटामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली यामुळे कांदा, गहू, हरभरा, मका, ऊस, डाळिंब, टॉमेटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळ-गारपिटीने तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान … Read more

गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपानंतर व सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशमुख यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. पाथर्डी आमदार मोनिका राजळे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा व या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीचे मागणी निवेदन देण्यात आले. … Read more

अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दीड कोटींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- नगर जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी विजांचा कडकडाट तसेच वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा 6 हजार 928 शेतकर्‍यांना तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे … Read more

अवकाळीने आणले बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाच्या सामना करत पीक पिकवणारा शेतकऱ्यांवर आता आस्मानी संकट कोसळले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. वादळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, कांदा, डाळिंब आदी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील नुकसानीनंतर पुन्हा रब्बीच्या अखेरीसही … Read more

बळीराजा झाला हवालदिल; अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- आधीच करोनामुळे बेजार झालेल्या जनतेला आणि शेतकर्‍यांना आता अवकाळी आणि गारपिटीचा जबर फटका बसला आहे. अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आणला असून काही ठिकाणी मळणी सुरू असल्याने शेतमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाचे झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमणावर आर्थिक … Read more

….त्यांची दुकाने तातडीने सील केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असून या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात लक्षणीय व चिंताजनक आहे. करोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने गुरुवारी (दि. 18) पाथर्डी नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच व्यापार्‍यांनी … Read more

ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलिसांनी उचलले आक्रमक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने व रात्रीच नव्हे तर भरदिवसा देखील या गावात घरफोड्या होऊ लागल्याने हे सर्व प्रकार अवैध धंद्यांमुळेच होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मिरी … Read more

‘त्यांच्या’ संघर्षात नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आज राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाथर्डी तालुक्यात मात्र अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. नुकताच येथील आठवडा बाजार झाला. बाजारात झालेल्या गर्दीतील माणसांकडुन कोवीडच्या नियमांचे उल्लंघन झाले. मात्र पालिका प्रशासनाची … Read more

कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपारीक पद्वतीने लावले तेल !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या समाधी उत्सवानिमीत्त पारंपारीक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंखध्वनीच्या निनादात महापुजा संपन्न झाली. यावेळी विश्र्वस्त, ग्रामस्थ उपस्थीत होते. कोरोनामुळे बाहेरगावच्या भाविकांना तेल लावण्याच्या विधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे देवस्थान समिती सदस्य, पुजारी, ग्रामस्थ, चार बेटातील मानकरी यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची … Read more

वीजपुरवठा खंडित; आमदार मोनिका राजळेंच्या तालुक्यात पाण्यासाठी होणार वणवण

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेवगाव-पाथर्डी नगरपरिषदेसह दोन्ही तालुक्यांतील 54 गावांना जायकवाडी धरणाच्या किनार्‍यावरील दहिफळ येथील जॅकवेलवरून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दररोज 1 कोटी 36 लिटर पाणी उपसा करावा लागतो. दहिफळ येथील जॅकवेलसह खंडोबामाळ व अमरापूर येथील पंप हाऊसला पाणी उपसा व वितरणासाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र या योजनेवरील वीज बिलाची मागील … Read more

कृषी विभागाच्या शेतातील 17 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- कृषी विभागाच्या शेतातील सुमारे 17 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाल्याची घटना जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. दरम्यान या आगीमुळे कृषी विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती समजती आहे. सविस्तर माहिती अशी कि, पाथर्डी शहरालगत कृषी विभागाची मोठी जमीन वापराविना पडून असून तेथे मोठ्या प्रमाणावर गवत आहे. येथून … Read more

भरदिवसा घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- दुपारच्यावेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून आतील सामानाची उचकापाचक करून सोने व रोख रक्कम असा तब्बल पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे घडली. पोलिस आउट पोस्टपासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या जयदीप चांगदेव … Read more

कानिफनाथांची समाधी असलेल्या ‘या’ गावात पाच दिवस प्रवेश बंदी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यातील  श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेच्या मुख्य पाच दिवशी कानिफनाथ समाधी मंदिरासह गावामध्ये भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे . यात्रेदरम्यान काठ्यांची मिरवणूक सुद्धा रद्द करण्यात आली असुन,  होळीपासून परिसरात पोलिसांकडून ठिक-ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. महसूल, पोलीस व देवस्थान … Read more