नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. राजळेंकडून दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  शनिवारी दुपारी (दि.२०) रोजी शेवगाव तालुक्यातील आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, लाडजळगाव, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे या गावांत गारपीट होऊन शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसानीची आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज सोमवारी पाहाणी करत हतबल शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले.

तसेच राज्य शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला ता. अध्यक्ष आशा गरड, आखेगावचे सरपंच बाबासाहेब गोर्डे, नायब तहसीलदार मयूर बेरड, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे,

गटविकास अधिकारी महेश डोके, कृषी सहाय्यक दीपक नरवणे, मंडलाधिकारी अनिल बडे, तलाठी गजानन शिकारे, ग्रामसेवक संतोष कातकडे, भगवान कोल्हे, अपासाहेब पायघन, गणेश काटे,

पोपट पातपुते, राधाकिसन पायघन, भगवान काटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील काही गावात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.

त्यामुळे गहू, कांदा, हरभरा, ऊस, टरबूज, पपई ,चारा पिके व आंबा, चिकू, संत्रा आदी फळ पिकांचेही नुकसान झाले. या नुकसानीची आज रविवारी आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाहाणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

या वेळी आ. मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|