जिल्ह्यातील आठ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव, कोरोना बाधित एका रुग्णाची प्रकृती उत्तम

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेले्या १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेला कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयाने … Read more

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे. सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई … Read more

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी आ. तनपुरेंनी दिले जिल्हाधिकार्यांना निवेदन

राहुरी –केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशा आशयाची मागणी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. ५ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील शेरी, चिखलठाण, कोळेवाडी, दरडगावथडी, म्हैसगाव या गावांमध्ये ढगफुटी झाली.  सलग चार तासांपेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांबरोबर काही … Read more

सोशल मीडियावर प्रचारासाठी पूर्व परवानगी आवश्यक !

अहमदनगर :- राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून, सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींना पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे. प्रसारण दिनांकाच्या ३ दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नाही, असे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट … Read more

लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात ‘ड्राय डे’ !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात श्रीरामपूर तालुका परमीट रुम अँड वाईन शॉप ओनर्स सोशल असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. त्यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन संबंधितांच्या … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात.

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाबाबत बैठक घेऊन त्यात भुसंपादनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाचे काम व्हावे यासाठी लक्ष दिले आहे. भुसंपादनाचे काम सुरू होऊन तीन महिन्यात कामाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली. प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ उपक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी द्विवेदी यांनी पत्रकार, तसेच आवृत्ती प्रमुखांशी … Read more

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. …तर हा हल्ला झाला नसता   या निवेदनात … Read more

मनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात !

परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत.