श्रीगोंद्याचे राजकारण धक्कादायक वळणावर !

श्रीगोंदा :- भाजपने पहिल्याच यादीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे भाजप प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप निवडणूक लढविणार नसून अण्णासाहेब शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी … Read more

तर मी उमेदवारी न करता पाचपुतेंचा प्रचार करेन : आमदार जगताप

श्रीगोंदे – नगर मतदारसंघात नागवडे-जगताप यांच्यापैकी एकच उमेदवार असेल. आम्ही शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या तालमीतले असून सयाजीरावांना पुन्हा एकदा घरी बसवणार आहोत, असे आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता कुकडी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सांगितले. बबनराव पाचपुते यांनी ३० ते ३५ वर्षे राजकारण केले. आमदार, मंत्री म्हणून … Read more

रस्ता ग्रामीण भागात महत्त्वाचा घटक : आ.जगताप

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील जनतेसाठी रस्ता हा महत्वाचा घटक आहे. रस्ता चांगला असेल तर आपला शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहचवणे त्यांना सहज शक्य होते. वेळेत माल पोहचविला तर बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे रस्ता हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. असे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. कोळगाव ते गुंडेगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात … Read more

आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा – नगरचे विद्यमान आमदार राहुल जगताप पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत पक्ष सोडण्यायाबाबत दोन्ही आमदारांनी स्पष्ट भाष्य अद्याप जरी केले नसले तरी त्यांचे निर्णय युती होणार कि नाही ह्या निर्णया नंतर हे दोघे आमदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते. … Read more

विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार : आ. राहुल जगताप

ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले, आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. … Read more

आमदार राहुल जगताप यांच्या निधीतील तब्बल ३ कोटी ८० लाख खड्ड्यांत…

श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे … Read more

श्रीगोंदे मतदारसंघासाठी १८ कोटींंचा निधी

श्रीगोंदे : श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत जल संधारणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील काही कामांचा कार्यारंभ आदेश झाला आहे, तर काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली. मतदारसंघातील ११ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ८७ लाख एवढा निधी मंजूर होऊन … Read more

विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील … Read more

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत … Read more

त्यांनी काय दिवे लावले ?

श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले. काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते … Read more

जगताप परिवाराला भाजप मध्ये ‘नो एन्ट्री’ !

अहमदनगर :- अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार राहुल जगताप हेही भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र पिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराचे आमदार संग्राम … Read more

आ.राहुल जगताप यांच्या कमी अभ्यासामुळे जनता मेटाकुटीला !

श्रीगोंदे :- आमदार राहुल जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात साकळाईबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडली, परंतु ही सूचना साकळाईचा गळा घोटण्यासाठीच होती. पाच वर्षे आमदार असताना शेवटच्या अधिवेशनात लक्ष्यवेधी का मांडली, असा सवाल पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोतम लगड यांनी बुधवारी केला. मुळात कुकडी प्रकल्पात पाणी कमी आहे. त्याकरिता आधी कुकडी प्रकल्पातील पाणी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी डिंभे … Read more

जे ३५ वर्षांत झाले नाही, ते काम ५ वर्षांत मी करून दाखवले – आ.राहुल जगताप

श्रीगोंदे – नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात २२.८० कोटी व जिल्हा वार्षिक योजनेत २.५ कोटी असा एकूण २५.३० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली. अनेक वर्षांपासून कामे झाली नसल्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून प्राधान्याने हे रस्ते मंजूर करून घेतले. जिल्हा वार्षिक योजनेतील काही कामांना … Read more

आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास करण्याची आवश्‍यकता

श्रीगोंदा – घोड कुकडी प्रश्नी राजकीय हस्तक्षेप नको म्हणणाऱ्या आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास व माहिती घेण्याची आवश्‍यकता असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांनी कुकडी प्रश्नी हस्तक्षेप केला नसता तर मागील आवर्तन मिळाले असते का? … Read more

मी प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही – आमदार राहुल जगताप

नगर :- पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुष्काळी परिस्थिती या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना मी केली. प्रत्यक्ष कामांचे मी उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही, असा टोला आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील साकत … Read more

श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांना जनतेचे देणे – घेणे नाही !

श्रीगोंदा :- तालुक्याच्या आमदारांना तुमचे काहीएक देणे नाही. अजून एक कारखाना कसा होईल, यासाठी ते काम करत आहेत. माजी आमदार तर उसाचे पैसेच देत नव्हते. मला लक्ष घालावे लागले. मग पैसे मिळाले. राधाकृष्ण विखेंना काँग्रेसने काय कमी केले, म्हणून ते मुलाला खासदार करण्यासाठी भाजपत गेले? ही मंडळी सत्ता आणि स्वार्थासाठीच काम करतात, अशी टीका आ.बच्चू … Read more

श्रीगोंद्यात भाजपची ताकद वाढली,आ.जगताप यांच्या पुढे संकट, पाचपुते विरोधकांना धोक्‍याचा इशारा !

श्रीगोंदा :- राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या स्वगृही श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले. यामुळे श्रीगोंद्यात भाजपची ताकद आणखीच वाढली आहे. अनपेक्षितपणे श्रीगोंदा तालुक्‍यातून डॉ. सुजय विखे यांना सुमारे 32 हजारांचे मताधिक्‍य मिळाल्याने भाजप समर्थकांना गगन ठेंगणे झाले आहे. चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या निकालाचा काय परिणाम होणार, याची … Read more

श्रीगोंद्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध,पाचपुतेंच्या पराभवासाठी जगताप – नागवडे एकत्र

श्रीगोंदा :- तालुक्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत नुकतेच पत्रकार परिषदेत दिले. आमदार राहुल जगताप यांनीही नागवडे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र राहून बबनराव पाचपुते यांचा पुन्हा पराभव करू, असे ‘बोलताना शुक्रवारी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने … Read more