आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

बेशिस्तांवर कारवाईसाठी एसपी व जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 वर्‍हाडींनाच परवानगी आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने आज सोमवारी कलेक्टर राजेंद्र भोसले हे एसपी मनोज पाटील यांना सोबत घेऊन तपासणीसाठी रस्त्यावर उतरले. या पथकाने सिटी, ताज आणि आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी रेड … Read more

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा अन लॉकडाउन टाळा! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.राज्यातील काही भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तरी, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे … Read more

तंबाखूमुक्त शाळा अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची सर्व संबधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आवश्यक तेथे आर्थिक दंड आकारावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तंबाखूमुक्तीसाठीच्या विविध … Read more

जिल्हाधिकारी म्हणाले…लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला सुधारला आहे. आता लसीकरण देखील सुरु करण्यात आले असल्याने नागरिक देखील बेभान होऊन नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे. मात्र राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावताना दिसत आहे. करोना अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत. जर नागरिकांनी नियम पाळले … Read more

बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात नावजलेल्या कापडबाजारासह पेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. अतिक्रमणावर हतोडा टाकून हे ग्रहण तातडीने सोडवा अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशने केली आहे. त्यासाठी व्यापारी प्रभारी आयुक्त तथा कलेक्टरांच्या द्वारी पोहचले. कापड बाजार, गंजबाजार, शहाजी रोड, नवी पेठ, मोची गल्ली ही बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. यातील कापड बाजाराला … Read more

आजपासून ‘हा’ सरकारी उपक्रम पूर्ववत!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-कोरोना संसर्गाच्या काळात स्थगित करण्यात आलेला लोकशाही दिन आजपासून पूर्ववत सुरु झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यावेळी लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला … Read more

कोरोना निधी बाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेला निधी व त्यातून झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर शहरात आले होते. ध्वजारोहणच्या कार्यक्रमानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री … Read more

चिकनवर ताव मारत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला महत्वपूर्ण संदेश

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. असे असले तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत … Read more

कोरोना लसीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केला हा दावा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्धयांना को-व्हॅक्सीनचे अर्थात लसीकरणाचे काम दि. १६ जानेवारीपासून जिल्हयातील १२ केंद्रावर सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लसीमुळे त्रास होत असल्याच्या बातम्या निराधार असून लसीबाबत संभ्रम नकोच. लाभार्थ्यांनी भिती बाळगण्याचे कारण नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला … Read more

बर्ड फ्ल्यू : ‘तो’ परिसर ‘अलर्ट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी या गावात कोंबड्यांची मरतुक झाल्याने मिडसांगवी गावच्या परिसराचा १० किमीचा परिसर अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण पाथर्डी तालुका नियंत्रीत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (दि.११) रात्री उशिरा जारी केला आहे. राज्यात काही भागात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला आहे. … Read more

जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद नाही; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच नगर जिल्ह्यात देखील अफवांचा बाजर उठला आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसली तरी राज्यात इतर … Read more

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशात बर्ड फ्लू या संकटाने कहर केला आहे. नुकतेच या संकटाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असतानाच या नव्या संकटाने प्रशासन पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. नुकतेच मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा … Read more

सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवले; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबाबत मोमीन आखाडा (ता. राहुरी) येथील उपसरपंच रंजना सोपान शिंदे आणि सदस्य चंद्रकांत दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकुब यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मोमीन आखाड्याचे सरपंच अशोक गेणु कोहकडे यांनी जिल्हाधिकारी … Read more

नगर शहरातील शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘सरप्राईज व्हिजीट’ जेवणाचा दर्जा आणि व्यवस्थेचीही केली पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेन्द्र भोसले यांनी आज सकाळी अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणार्‍या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारणा केली. आज सकाळी कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी … Read more

जिल्हाधिकारी डॉ. भोसले महापालिकेचे प्रभारी आयुक्त

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार आज सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. या रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडेच राहाणार असल्याचे नगरविकास खात्याच्या सचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. मायकलवार यांनी मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती. … Read more

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे 1 जानेवारीला सह्याद्री वाहिनी वर थेट प्रसारण

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-दिनांक 1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जयस्तंभ अभिवादनास देशभरातून दरवर्षी दिनांक 1 जानेवारी रोजी मोठया संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोना … Read more

ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्व अधिक – जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहकांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर आजच्या राष्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला. ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी … Read more