मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती. मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक … Read more

भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

नगरमधील शिंदेशाही धोक्यात, गड येईल पण सिंह जाईल?

कर्जत – जामखेड – जिल्ह्यात युतीचे भाजपाचे वारे जोरात आहेत. येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे. ना. राम … Read more

पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार ?- अजित पवार

कर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग … Read more

पाणी न देणारेच आज पाण्याच्या घोषणा करत आहेत : ना.शिंदे

जामखेड : आजवर तालुक्याला पाणी देण्यास ज्यांनी टाळाटाळ केली तेच आता पाणी देण्याच्या घोषणा करत आहेत. आम्ही मात्र शहर व वाड्यावस्त्या टँकरमुक्त होण्यासाठी पुढील ५० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून ११७ कोटीची रुपयांची उजनी धरणातून पाणीयोजना मंजूर केली आहे. त्यामुळे आगामी काळात जामखेड शहर नव्हे तर तालुकाच टँकरमुक्त होईल.राज्यातील सहकारी सेवा संस्थेच्या सचिवांना सरकारी सेवेत सहकार विभागात … Read more

राम शिंदे म्हणतात… आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करतो !

जामखेड दहा वर्षांत मी कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करणार आहे, असा इशारा भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांनी दिला.  जगन्नाथ राळेभात व माझी सेटिंग होती. राजकारणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या प्रचारासाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली … Read more

पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती, सन्मानाने पार्सल परत पाठवा: ना. शिंदे

कर्जत : पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती असून, बाहेरून आलेले पार्सल सन्मानाने परत पाठवा, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता केले. कर्जत तालुक्यातील राशीन गटात ना. शिंदे यांनी विविध गावांना भेटी देत ग्रामस्थाशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते. वायसेवाडीत ना. शिंदेंसह भाजपा कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत … Read more

मतदानानंतर रोहित पवार गायब होणार!

जामखेड: उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा, यामुळे दिवसेंदिवस मला जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे २१ तारखेनंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी कली. तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांशी … Read more

रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा

जामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते. आता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी … Read more

राम शिंदे, रोहित पवारांसह सहा उमेदवारांच्या हिशेबात त्रुटी !

कर्जत – राशीन भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, मनसेचे अप्पासाहेब पालवे यांच्यासह अपक्ष बजरंग सरडे, ज्ञानदेव सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांना नोटीस बजावली.  विहित नमुन्यात खर्चाचा सर्व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवारी खर्च निरीक्षक नागेंद्र … Read more

कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा … Read more

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते !

कर्जत :- सामान्य घरात जन्मलेल्या राम शिंदे यांना कर्जत-जामखेडच्या जनतेने नेता बनवले. ते लादलेले नेतृत्व नाही, तर घडवलेले आहे. समोरचा उमेदवार जरी धनधांडगा असला तरी लोकशाही धनधांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते.  मतदारांनी शिंदेंसारख्या सामान्य नेतृत्वाला संधी देऊन मावळच्या जनतेने जसे पार्थचे पार्सल परत पाठवले, तसे रोहितचे पार्सल … Read more

कर्जत -जामखेड मतदारसंघात बारामतीचं अतिक्रमण होवू देऊ नका

जामखेड : ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण या भागातील महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच मतदारसंघात मोठ मोठे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध होईल.हे सर्व पूर्णत्वास येण्यासाठी याभागात बारामतीचे अतिक्रमण होवू देऊ नका. असे … Read more

लंकेत सोन्याच्या विटा आहेत त्या तुमच्या काय कामाच्या ?

जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. त्या तुमच्या कामाच्या नाहीत. असा खोचक सवाल भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. विरोधकांनी काय काम केले? यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, सरपंच विद्या मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट कर्जत-जामखेड मतदारसंघ

रोहित पवार-प्रा.शिंदे यांच्यातला सामना रंगणार लक्षवेधी लढत: कर्जत-जामखेड मतदारसंघ कर्जत-जामखेड मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. त्याला कारणही इथली समाजरचना. नगर जिल्ह्यात पहिलं कमळ फुलविण्याचा मान याच मतदारसंघाकडं जातो. मतदारसंघ आरक्षित असतानाही इथं भारतीय जनता पक्षाचाच आमदार होता आणि मतदारसंघ खुला झाल्यानंतरही भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून प्रा. राम … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद

जामखेड  – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात. रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

पालकमंत्री राम शिंदेसह माजी मंत्री पाचपुतेंनी भरला अर्ज

नगर : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात मंगळवारी एकूण सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारअखेर एकूण १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून तब्बल ११३ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मंगळवारी … Read more