कोरोनाचा शिर्डीकरांना फटका, भाविकांच्या संख्येत झाली ‘इतकी’ घट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला असून, भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाबत भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. देशातील सर्वाधिक भाविक येत असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांची संख्या रोडावली असून, परीक्षांबरोबरच कोरोना हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या २० … Read more

संजूबाबा तब्बल 13 वर्षांनंतर साईचरणी लिन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  बॉलीवुडचा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता संजय दत्त याने तब्बल तेरा वर्षांनंतर काल गुरुवारी मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येऊन साईबाबांंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्याच्या चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दत्त परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. पिता सुनील दत्त हे सुद्धा नेहमीच शिर्डीत साई दर्शनासाठी येत होते. अलिकडेच बहीण प्रिया दत्त … Read more

साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या त्या एका वाक्यामुळे साईभक्त नाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा केल्याने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची बैठक घ्यावी व यापुढे साईबाबा जन्मस्थळाच्या उल्लेखावरून वाद होणार नाही याबाबत सरकार पातळीवर काळजी घ्यावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे. … Read more

या कारणामुळे आज साईबाबांचे दर्शन नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नाताळ सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दर्शनरांग व मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसत आहे. नाताळ सुटी व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत राहील असे चित्र आहे. सूर्यग्रहणामुळे गुरुवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत साईमंदिर बंद राहणार … Read more

सावधान : या दिवशी तीन तास बंद रहाणार साईंचे मंदिर जाणून घ्या कारण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :-  कंकणाकृती सूर्यग्रहण दि. २६ डिसेंबर रोजी असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात  आला आहे. या दिवशी सकाळी ८ ते ११ यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्­यात येणार असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. यावेळी बोलताना मुगळीकर म्हणाले कि, दि. २६ … Read more

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डीत सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, … Read more

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे ‘हाजिर हाे’

औरंगाबाद –  शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना १९ नाेव्हेंबर राेजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले आहेत.  हावरे यांनी ५० विषयांच्या मंजुरीसाठी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले हाेते. खंडपीठाने शिर्डीच्या दैनंदिन कारभारासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे. मात्र ५० विषयांची यादी न्यायालयात सादर करणाऱ्या शिर्डी संस्थानच्या वकिलासह … Read more

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना अवमान नोटीस

औरंगाबाद / शिर्डी- जागतिक तिर्थक्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाप्रकरणी दाखल जनहित याचिका आणि दिवाणी अर्जावर उच्च न्यायालयात गुरुवार (दि. ७) सुनावणी झाली.  त्यावेळी अनेक आरोप करण्यात आले. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वकील नितीन पवार यांनी अध्यक्षांनी संस्थानची बाजू मांडण्यास मज्जाव केल्याचे तर संचालकाने धमकावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.  तसेच … Read more

व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा !

शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला. याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच … Read more

साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

शिर्डी :- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल. गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या … Read more