साईसंस्थानचे संभाव्य नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- साईसंस्थानचे संभाव्य नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. साईसंस्थान व ग्रामस्थ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व त्यांचे सहकारी संजय शिंदे व राहुल गोंदकर, विश्‍वस्तपदाचा अनुभव तसेच साईमंदिरातील दर्शनव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारे डाॅ. … Read more

‘साई संस्थानच्या अध्यक्षपदी अँड . ढाकणे यांची नियुक्ती करा’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सध्या चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांची नियुक्ती करण्याची मागणी आता पुढे आली आहे. पाथर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पक्षाध्यक्ष शरद … Read more

साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळवून या पदावर आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी, अशी एकमुखी मागणी राहाता तालुका काँग्रेसने केली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरचिटणीस प्रियंका सानाप, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस … Read more

शिर्डी संस्थान च्या विश्वस्त पदी पत्रकारांना संधी द्या !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  जागतीक दर्जाचे ख्याती असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त पदी जिल्हातुन एका जेष्ठ पत्रकाराची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे पाटील यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पञाव्दारे मागणी केली आहे. जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिराच्या विश्वस्त पदाच्या … Read more

साई संस्थान अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून ‘हे’ नाव चर्चेत

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- सध्या शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे, यात काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर असताना राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याचे समजते. वाबळे हे माजी खा बापूसाहेब तनपुरे यांचे विश्वासू आहेत. तसेच, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. तनपुरे … Read more

साईमंदिरासमोर गार्डन विकसित होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून साईमंदिरासमोर असलेल्या नगर-मनमाड रोडलगतच्या त्रिकोणातील मोकळ्या जागेत भव्य असा बगिचा, लहान मुलांना गार्डन आणि भव्य अशी कोरीव व अप्रतीम साईबाबांची मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती … Read more

तिच्या मृत्यूशी झुंज संपली ! डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- म्यूकरमायकोसिस आजाराच्या विरोधात मृत्यूशी झुंज देणाऱ्या शिर्डी येथील श्रद्धा कोरके या पाच महिन्याच्या चिमुकलीची गेल्या अठरा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी अखेर संपली. या चिमुकलीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न केले. परंतू, नियतीने त्यांना अपयश दिले.जीवनमृत्यूच्या लढाईत म्यूकरमायकोसिसने काल सकाळी चिमुकल्या श्रद्धाचा बळी घेतला.शिर्डी शहरात वास्तव्यास असलेल्या कोरके … Read more

श्रीसाईबाबा संस्थान निवड : लवकरच चित्र स्पष्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसाईबाबा संस्थांनमध्ये विश्वस्त मंडळाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून सात ते आठ दिवसांत शिर्डी साई संस्थानचे अधिकृत विश्वस्त मंडळ स्थापन होणार असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच राज्य सरकार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अतिशय महत्वाचं आणि मानाचं … Read more

साई संस्थांनच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ‘या’ आमदाराची नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  शिर्डी साईबाबा संस्थांनच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला हि खुर्ची मिळणार याकडे सध्या नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एक महत्वपूर्ण मागणी समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी … Read more

शेवटी मृत्यूने ‘त्या’ चिमुकलीला गाठले; जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे म्युकरमायकोसीस संकटाचे ढग जिल्ह्यावर दाटून आले. यातच नुकतेच शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोना नंतर म्युकरमायकोसिस या आजराची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. शिर्डी शहरातील श्रद्धा कोरके या साडेपाच … Read more

धक्कादायक ! अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीला म्युकरमायकोसीची लागण

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये वाढ होत आहे, व रोगाचा धोका देखील आता हळुहली वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डीत अवघ्या ५ वर्षाच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत … Read more

वीस हजारांची लाच घेताना पोलिसास रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील विभागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईकास वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचे कडून उपस्थित पंचासमक्ष २० हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. भाऊसाहेब संपत सानप (वय—४४, राहणार संगमनेर, नेमणूक लोणी पोलीस ठाणे) असे … Read more

“प्रवरेचादेवयोगी”नामदार श्री. राधाकृष्णजीविखे पाटील साहेब

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  आज दि. 15 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री व शिर्डी विधानसभा मतदार संघाचे सन 1994 पासून आजपावेतो सलग प्रतिनिधित्व करणारे विकासाचे अग्रदूत सन्मा. आमदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रात आजपर्यंत आपण अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली घराणी पाहिली आहेत परंतु विकासाच्या व … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गती दिली असून डाव्या कालव्याच्या 64 ते 70 किलोमीटर लांबीची पाहणी आज महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली. कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला. आमदार डॉ सुधीर तांबे, … Read more

साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी अनेक वेळा राजकीय व्यक्तींची नेमणूक झाली आहे. त्यात अनेक गैरप्रकार व आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने या संस्थानची बदनामी झाली आहे. यामुळे साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी … Read more

साईबाबा संस्थानवर जिल्ह्यातील प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दीर्घकाळ रखडलेल्या नव्या संस्थानच्या नियुक्तीची चर्चा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनीही संस्थानवर राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत सामाजिक क्षेत्रातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे … Read more

साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची नावे चर्चेत…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आहेत. मात्र अध्यक्षपदाची माळ काेणाच्या गळ्यात याकडे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू अाहे. उच्च न्यायालयाने विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साईमंदीर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगूल वाजेल अशी चिन्हे आहेत. साईंस्थानच्या अध्यक्षपदासाठी आमदार आशुतोष काळे, … Read more

कोरोनापासून दोन हात लांबच राहण्यासाठी शिर्डीकरांनी केला हा प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधित तालुका प्रशासनाने गावपातळीवर जनता कर्फ्यूचे निर्णय घेतले आहे. यातच आता शिर्डी कर देखील कोरोनाला दोन हात लांब ठेवण्यासाठी … Read more