जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिवाजी कर्डिले ‘किंगमेकर’

राहुरी :- डाॅ. सुजय विखे यांना भाजपत घेण्यात किंगमेकर ठरले ते आमदार शिवाजी कर्डिले. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी डाॅ. विखे यांना भाजपत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते.  तुम्ही भाजपत आलात, तर खासदार झालात म्हणून समजा, घाटावर रहायला या असे ते म्हणाले होते. सुरुवातीला डाॅ. विखे आपण अपक्ष उमेदवार आहोत, असे सांगत होते.  मात्र, राहुरीत … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला !

अहमदनगर :- शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला आहे. केडगाव हत्याकांडात त्यांच्या मुलीवरच आता आरोपी होण्याची वेळ आली आहे. नातेवाइकांमध्ये भांडणे लावणाऱ्या कर्डिले यांना येत्या विधानसभेला धूळ चारण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सर्वांनी मला साथ द्यावी,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली. … Read more

लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून मला ऑफर – आ.शिवाजी कर्डिले.

राहुरी :- सलग पाच वेळा आमदार आणि निवडून येण्याची खात्री असल्यामुळे मला सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर येत आहे. परंतु मी भाजपमध्येच खूश आहे. लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिराळ येथे सुमारे पावणेचार कोटींच्या विविध विकासकामांना प्रारंभ करताना आमदार कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते अक्षय … Read more

राहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार – आ.कर्डिले.

राहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. प्रिंपी अवघड येथील २५ लाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना कर्डिले म्हणाले, मी दुष्काळी भागातील असल्याने पाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. सोनई प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून प्रिंपी अवघड गावाला … Read more

माझी लोकसभेची हौस फिटली – आ.शिवाजी कर्डिले

अहमदनगर :- माझी लोकसभेची हौस फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. औटी अभ्यासू आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यांनी लोकसभा लढवावी. मी त्यांचे काम करेन, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगताच कर्डिले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून दिले म्हणजे मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांना वाटत असेल. पण मी लोकसभा लढणार नाही, … Read more

25 वर्षापासून आमदारकी ही फक्त लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी !

अहमदनगर :- सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत जनतेमध्ये राहून मतदार संघात विविध विकास कामांबरोबरच सर्वसामान्य लोेकांचे प्रश्‍न सोडविले. त्यांच्या सुख:दु:खात बरोबर राहिल्याने गेल्या 25 वर्षापासून आमदारकी ही फक्त जनसामान्य लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पणाला लावली. यामुळे मला राजकारणातून संपविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील विरोधक एकत्र येत परिवर्तनाची हाक देत आहेत. मला संपविण्यासाठी महाराष्ट्रातील पुढारी जरी एकत्र … Read more

विखे-कर्डीले यांच्यामधील मैत्री संपुष्टात येणार ?

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा भाजपाचे तिकीट खासदार दिलीप गांधी यांना निश्‍चित झालेले आहे. मोठा मतदार संघ असल्याने त्यांचा संपर्क कमी असला तरीही आम्ही बाकी आमदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार असल्याचे वक्तव्य आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. मोमीन आखाडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार कर्डिले यांच्या हस्ते … Read more

आ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी !

अहमदनगर :- आ. शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल रोखत डॉ. प्रकाश कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी मिलिंद मोभारकर यांनी न्यायालयात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हद्दीतील जमिनीच्या व्यवहारातील ९२ लाख रुपये परत मागितल्याने कर्डिले यांनी ही धमकी दिल्याचे मोभारकर यांनी सोमवारी न्यायालयासमोर सांगितले. फसवणूक प्रकरणी … Read more