नगर दक्षिणेतून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे खासदार !

अहमदनगर :- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी – उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा २ लाख ७५ हजार ७१० मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तथा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा १ लाख २० हजार १९५ … Read more

सुजय विखे म्हणतात प्रवरा पॅर्टन जिल्ह्यात पुन्हा जिवंत !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत माझा होत असलेला विजय मी माझे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण करतो. नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. डॉ. विखे म्हणाले, ‘माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. राजकारणापलीकडे एकत्र येऊन माझ्या विरोधात … Read more

नगर दक्षिणेत सुजय पर्व ! सुजय विखे पाटलांचा विजय निश्चीत

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती. आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे … Read more

Live Updates : डॉ. सुजय विखे यांनी ३७ हजार २४२ मतांनी आघाडी घेतली

अहमदनगर :- तिसर्या फेरीनंतर डॉ. सुजय विखे यांनी ३७ हजार २४२ मतांनी आघाडी घेतली.तिस-या फेरीअखेर डॉ. सुजय विखे यांना ८८ हजार २६४ तर आमदार संग्राम जगताप यांना ५१ हजार २२ एवढी मते . नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून पहिल्या आणि दुसर्या फेरीत सुजय विखे यांनी २२ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. डॉ. सुजय विखे … Read more

Live-updates : संग्राम जगताप Vs सुजय विखे कोण होणार खासदार ?

Loksabha Elections 2019 Results : लोकसभा निवडणूक निकाल येण्यास अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल. निकालाचे अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स देण्यासाठी आमची टीमही सज्ज आहे.  वेबसाईट,मोबाईल App,Whatsapp फेसबुक, ट्विटर आणि पासून  नोटिफिकेशनद्वारे अहमदनगर Live24 व अहमदनगर Times Group तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी https://www.facebook.com/ahmednagarlive24 ट्विटर अकाऊन्ट वर … Read more

कोण होणार नगरचा खासदार ? नगरकरांची उत्सुकता शिगेला !

निकालाला अवघे काही तास राहिले आहे त्यामुळे आता सर्वांच्या नजरा २३ मे कडे लागल्या आहेत. चौकाचौकात, पारा पारावर, बाजारामध्ये, चहाच्या टपरीवर जिथे कुठे माणसं भेटतील, त्या प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा.. दक्षिणेत काय होईल  कोण असेल दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की संग्राम जगताप? मागील तीन वर्षांपासून सुजय विखे यांनी जंग जंग पछाडले होते. डाॅ. सुजय विखे … Read more

विखे घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा

संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले. जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे … Read more

मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये – डॉ.सुजय विखे

संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे. ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली. या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी … Read more

डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार

अहमदनगर :- भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी गप्पांच्या फडात ‘तुमच्याकडे कोण चालणार’ हाच एकमेव प्रश्न चर्चेत आहे. चतूर मतदार कल जाणून घेऊ पाहणाऱ्यांचा अंदाज ओळखून उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते हवेत असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.  … Read more

देशद्रोही लोकांच्या देणग्या घेणारा खासदार हवाय का?

अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा. याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार … Read more

निवडणूकीसाठी खर्च करण्यात डॉ.सुजय विखे पहिल्या तर संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर….

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले. … Read more

…तर सुजय विखे पुढच्या निवडणुकीचा फॉर्मही भरणार नाही

शेवगाव :- उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधी उमेदवाराने इकडचे दौरे सुरू केले. त्यामुळे त्यांना इथले प्रश्न काय माहीत? असा प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. गुरुवारी सायंकाळी विखे, आमदार मोनिका राजळे यांनी बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. विरोधी उमेदवारांपेक्षा … Read more

सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली

श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला. उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी … Read more

अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.

अहमदनगर : आज उत्तरेचे अतक्रिमण म्हणून आमच्यावर निरर्थक टिका केली जाते पण अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन आहेत. समोरचा उमेदवार मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे गुणगान गात आहे पण तुम्ही त्याला तुमच्या कामाचा अर्ज देवू शकता का? असा सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. नुसते उपलब्ध असुन चालत नाही … Read more

‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर :- एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी, एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल, अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती. त्याचा खुलासा विखे यांनी शनिवारी सादर केला आहे. … Read more

सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होणार आहे. सावेडीतील निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ, सभेला येणार्‍या नागरिकांसाठी सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवर मंडप उभारणी करण्यात येत आहे. सभेच्या ठिकाणी सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याबाहेरील पोलिसांचा … Read more