घुले बंधूंच्या रणनीतीमुळे निवडणूक बनली अटीतटीची!

शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून वापरला गेलेला कास्ट पॉलिटिक्‍सचा फॉर्म्यूला राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही गवसल्याने विधानसभा निवडणूकीत रंगत वाढली आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक घुले बंधूंच्या रणनितीमुळे अटीतटीची बनली आहे. भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऍड. प्रताप ढाकणे यांना निवडणूक रिंगणात उतरून घुले बंधूंनी 1999 साली स्वर्गीय मारुतराव घुले यांनी वापरलेल्या … Read more

म्हणून मी पक्षांतर केले… उदयनराजे भोसले

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. त्यासोबतच त्यांची पक्षांतर करण्याची भूमिकाही लोकांना पटवून द्यावी लागणार आहे. ‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे … Read more

कितीही वाद झाले, तरी कोठे थांबायचे हे त्यांना माहिती!

संगमनेर :- राज्याचे लक्ष लागलेल्या शिर्डी आणि संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची ‘समझोता एक्स्प्रेस’ या वेळी देखील भन्नाट सुटली. थोरात यांच्या विराेधात विखे घराण्यातील, तर विखेंच्या विरोधात थोरातांचे नातेवाईक असलेल्या तांबे घराण्यातील उमेदवार दिला जाईल, हा परस्परांचा दावा फोल ठरला. त्यामुळे थोरातांविराेधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे आणि विखेंच्या विरोधात … Read more

बाळासाहेब थोरांतापेक्षा विरोधी उमेदवार चौपट श्रीमंत !

संगमनेर :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा महायुतीचे साहेबराव नवले यांची मालमत्ता चौपट आहे. थोरात कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२ कोटी असून नवले कुटुंबीयांची मालमत्ता ४४ कोटी ६३ लाखांच्या घरात आहे. आमदार थोरात यांच्याविरोधात दहा जण निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, त्यांची लढत शिवसेनेचे साहेबराव नवले यांच्याशी आहे . हे दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तगडे आहेत. थोरात यांच्या … Read more

नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अचानक हजेरी लावली. यावरून नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ढोकराई फाटा येथे प्रगती कार्यालयात नागवडे समर्थकांचा मेळावा झाला. नागवडे निवडणुकीत काय भूमिका घेतात, … Read more

31 कोटी संपत्ती असणाऱ्या विखेंकडे नाही एकही चारचाकी !

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक … Read more

नगरच्या दोन्ही माजी आमदारांनी शहर विकासाचे विद्रुपीकरण केले !

अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.  तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता … Read more

सुजित झावरेंचे बंड थंडावणार ?

पारनेर :-  जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवत नगर जिल्हातील नेत्यांशी महाआघाडी करून विधानसभा निवडणुकीत उतरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर राहुन पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना मदत करावी. अशी गळ राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी झावरे यांना घातली आहे. दुसरीकडे झावरे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते … Read more

मला पाठबळ देवून राज्यात नवा इतिहास घडवा – राधाकृष्ण विखे पाटील

राहाता :- तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना मी कुठेही कमी पडलो नाही. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलतानाच सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम केले. भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे, निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागात उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांच्या कामाचा अजेंडाच आपल्या समोर आहे. हे काम करण्यासाठी मला पाठबळ … Read more

सत्य नेहमी कडू असते पण ते सत्यच असते साहेब…

तालुक्यातील लोकांनी पदरमोड करून, उपाशी राहून, बायकोचे मंगळसूत्र मोडून कारखाना उभा करायला पैसे दिले होते. कारखाना हा तालुक्यातील लोकांच्या घामाच्या पैशावर उभा राहिलेला आहे, त्यासाठी साहेबांनी आपल्या घरातून कीती पैसे दिले याचा हिशोब आहे का.? कसा असणार, कारण अनेक शेतकऱ्यांनी आपल्या काळजाचा तुकडा असलेले बैल विकून कारखान्यासाठी पैसे दिले होते पण साहेबांचा एक शिंगाचा का … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

विखे आणि शिंदेंना मंत्रिपदे मिळतील पण आ.शिवाजी कर्डीलेना नाही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री … Read more

आमदार वैभव पिचड आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अकोले – अकोलेत भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्याकडे स्थावर – जंगम मालमत्ता व सर्व प्रकारचा उत्पन्नाचा “सोर्स’ ध्यानात घेता ते पाच कोटीचे मालक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर जवळपास कोटीच्या आसपास कर्जाचाही बोजा आहे. स्वयंचलित अशी दोन कोटी 89 लाख तर वारसाने आलेली दोन कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी त्यात … Read more

कोपरगावात कोल्हे गटाला पडले खिंडार !

कोपरगाव :- तालुक्याच्या दक्षिण भागातील बहादरपूर व अंजनापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहादरपूर गावातील कोल्हे गटाला मोठे भगदाड पाडून असंख्य युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये अंजनापूरचे भास्कर महाराज गव्हाणे, … Read more

पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र

अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल … Read more

अहमदनगर मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर नामुष्की !

अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती. मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन … Read more

आता संगमनेरात परिवर्तन अटळ !

संगमनेर : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, उद्योजक साहेबराव नवले यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसैनिकांसह भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली उमेदवारी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व नागरिकांसाठी असून संगमनेरात परिवर्तन अटळ असल्याचे मत उमेदवार नवले यांनी या वेळी … Read more

नगर, पुणे, मुंबई येथे मालमत्ता…अशी आहे अनिल राठोड यांची संपत्ती !

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे ३ कोटी ५९ लाख ७० हजार १६७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे ६३ लाख ७५ हजार ४८८ रुपयांची संपत्ती आहे. राठोड यांनी काल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे उमेदवारी अर्जासह संपत्ती विवरणाचे शपथपत्र सादर केले. त्यानुसार त्यांच्याकडे १ कोटी २० लाख ६५ … Read more