OPPO A3x Smartphone:- स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ओपो या कंपनीने मागील काही दिवसां अगोदर भारतीय बाजारामध्ये स्वस्त किमतीतला 4g फोन ओप्पो A3x लॉन्च केला होता व त्याची किंमत तेव्हा 8999 इतकी होती.
आता कंपनीने याच फोनमध्ये नवीन स्टोरेज वाढवून नवीन स्टोरेज व्हेरियंट भारतीय बाजारात सादर केला आहे. या अगोदर सादर करण्यात आलेल्या ओपो A3x फोन मध्ये ज्या पद्धतीचे स्पेसिफिकेशन आहेत तसेच स्पेसिफिकेशन यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत.
आता यामध्ये स्टोरेज क्षमता वाढवण्यात आलेली आहे. या फोनमध्ये एक नवीन वैशिष्ट्य देण्यात आलेले आहे व ते वैशिष्ट्य म्हणजे मिलिटरी ग्रेड शॉक रेजिस्टन्स हे होय. या वैशिष्ट्यामुळे हा फोन उंचावरून जरी पडला तरी या फोनचे काही बिघडणार नाही. म्हणजेच हा फोन उंचावरून पडून देखील चांगल्या स्थितीत राहू शकतो.
काय आहेत या फोनमध्ये वैशिष्ट्ये?
ओपो A3x हा चार जी स्मार्टफोन असून यामध्ये 6.67 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये पंच हॉल डिझाईन सह येणार आहे.एलसीडी पॅनल देण्यात आलेला असून जो 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलींग रेट आणि १००० नीट्स ब्राईटनेस ला सपोर्ट करतो.
एवढेच नाही तर या फोनमध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6s 4G Gen 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला असून ग्राफिक्स करिता या फोनमध्ये ॲड्रेनो 610 GPU देण्यात आले आहे.
तसेच यामध्ये चार जीबीची रॅम देण्यात आले आहे तर 128 जीबीचा स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन चार जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो व त्यामुळे एकूण याची स्टोरेज आठ जीबी रॅम पर्यंत वाढते. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित कलर ओएस 14 वर चालतो.
या फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ऑटो फोकस सपोर्ट असलेला आठ मेगापिक्सल चा मेन कॅमेरा देण्यात आलेला आहे.तसेच एक फ्लिकर सेंसर देखील यामध्ये देण्यात आला आहे.
व्हिडिओ कॉल आणि सेल्फी करिता पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये असून पावर बॅकअप साठी शक्तिशाली अशी 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 45W SUPERVOOC फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
किती आहे OPPO A3x 4G च्या नव्या व्हेरियंटची किंमत?
या फोनच्या चार जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 9999 रुपये ठेवण्यात आली आहे तर जुना चार जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 8999 रुपये आहे. हा स्मार्टफोनवर बजाज नो कॉस्ट ईएमआय पर्यायाअंतर्गत पाचशे रुपयांचा डिस्काउंट देखील यामध्ये मिळतो.