Monsoon News: राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांशी भागात पावसाचे उघडीप, वाचा अंदाज

Published on -

Monsoon News:-  जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यामध्ये मान्सून सक्रिय होऊन राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरिपांच्या पेरण्यांना वेग आला. परंतु आज राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. जोरदार पावसाने आज राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाठ फिरवलेली दिसून येत असून काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

 काय आहे आजचा राज्यातील हवामान अंदाज?

राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पावसाने उघडीप दिलेली असताना राज्यातील कोकणासह विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याचा देखील इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. राज्यातील काही भागासाठी पावसाचा इशारा असताना मात्र कोकण वगळता राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. तर काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण भागामध्ये दहा ते 13 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून किनारपट्ट्यांवर सोसाट यांचा वारा वाहणार असल्याचा देखील अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात  देखील येलो अलर्ट असून काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी मुसळधार तर विदर्भामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि विदर्भातील ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

 देशातील मान्सूनची स्थिती

सध्या वायव्य राजस्थान आणि शेजारच्या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान असून मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थिती पेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. तसेच हा कमी दाबाचा पट्टा बिकानेर कडे सरकत असून हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य राजस्थान आणि शेजारच्या भागात आहे.

तसेच उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ व बिहार मधील पटना, बालूरघाट आणि पूर्व मणिपूर भागात कमी दाब क्षेत्राचा पट्टा आहे. पूर्वेकडून वारे समुद्रसपाटीपासून 5.1 ते 9.5 किलोमीटर उंचीवर आहेत. असाच किनारपट्टीला समांतर असलेल्या कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण गुजरात पासून उत्तर केरळ पर्यंत विस्तारलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News