अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.

File Photo
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- सरकारी नोकरीची मोठी संधी ! NPCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी
- 2026 मध्ये ऍपल लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; आयफोन 17e, 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्ससह स्मार्टफोन लाईनअप होणार पूर्ण
- आठव्या वेतन आयोगाची तयारी; फिटमेंट फॅक्टरवर चर्चेची अपेक्षा
- गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! SEBI कडून १२ कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी, लवकरच शेअर बाजारात नवे पर्याय
- आनंदाची बातमी ! आता अवघ्या १५ दिवसांत मतदार ओळखपत्र मिळणार













