अहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे.
यामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस यांना देण्यात आले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणाच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना विद्यमान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून, यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करत असल्याचे सांगितले.
प्रा. राम शिंदे यांनी 2009 निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले होते.पूर्वी व सध्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आहे.
याच कमाईमधून त्यांनी 10 कोटींचा अलिशान बंगला बांधला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात केलेल्या गैरकारभाराची व त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी,
ओबीसी मंत्री असताना स्वतःच्या सासर्यास निवासी शाळा चालविण्यास दिल्या आहेत. तसेच नाशिक, बारामती एमआयडीसी कंपन्यांत असलेली भागिदारी याची देखील निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! हैदराबाद – अजमेर दरम्यान चालवली जाणार नवीन रेल्वेगाडी, महाराष्ट्रातील या 8 स्थानकावर थांबा मंजूर
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोणत्या वर्षातील कर्ज माफ केले जाणार ? शेतकरी कर्जमाफीबाबत नवीन अपडेट
- आर्थिक संकटाच्या काळातही गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त नफा ! ‘या’ 5 शेअर्सने दिलेत 380 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न
- पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट, पुन्हा रेल्वे मार्गाचा रूट बदलणार, रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला नवा प्रस्ताव !
- 2026 च्या सुरुवातीला पुणेकरांना मिळणार खास गिफ्ट ! शहरातील ‘या’ महत्त्वपूर्ण मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस