किंगमेकर शिवाजी कर्डिलेंचे स्वप्न भंगले !

राहुरी :- नगरच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका निभावणारे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचा दारुण पराभव झालाय.

राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केलाय.

आमदार शिवाजी कर्डिले ह्यांची सत्ता या निकालामुळे संपुष्टात आली आहे.

सलग सहाव्यांदा आमदार होण्याच त्यांच स्वप्न ह्या निकालानंतर भंगले आहे.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दमदार कमबॅक केलंय. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेत निर्णायक मते घेतली.