‘ह्या’ ठिकाणी नोकरीची संधी ; मिळेल 1.05 लाख रुपये पगार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांनी पानिपत रिफायनरीज विभागात जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट (JEA) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट व जूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट या पदावर वॅकन्सी काढल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत 5 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट iocrefrecruit.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25000 ते 1.05 लाख रुपये पगार मिळेल.

पदांची संख्या : 57 :-

  • – जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट-4 (प्रोडक्शन) – 49 पद
  • – जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट-4 (मेक फिटर कम रिगर)/ जूनियर टेक्निकल असिस्टेंट – 03 पद
  • – जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट-4 (इंस्ट्रूमेंटेशन) – 04 पद
  • – जूनियर क्वॉलिटी कंट्रोल एनालिस्ट – 01 पद

या तारखा लक्षात ठेवा :- ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात – 12 ऑक्टोबर 2020 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2020 लेखी परीक्षेची तारीख – 29 नोव्हेंबर

वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे असावे. एससी प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळेल.

फी :- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्ग व ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) वर्गातील उमेदवारांना 150 रुपये भरावे लागतील.

तर अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर क्लिक करुन सूचना वाचू शकता.

https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/advert_pdf/82.pdf

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved