अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतलेल्या कृषी विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आज आपले आंदोलन मागे घेतले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले होते.

अखेर मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दालनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यात सातवा वेतन आयोग राज्यातील कृषी विद्यापीठांना लवकर लागू करण्याचे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांनी दिली. शासनाने दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती देऊन विद्यापीठास आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र देणार असल्याचे डॉ. देवकर म्हणाले.
आंदोलनासाठी उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. सचिन सदाफळ, मच्छिंद्र बेल्हेकर, मच्छिंद्र बाचकर, डॉ. संजय कोळसे, डॉ. कैलास कांबळे, गणेश मेहेत्रे, जनार्दन आव्हाड, संजय ठाणगे यांनी प्रयत्न केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













