बर्ड फ्लू ! वस्तीजवळ मृत कोंबड्या आणून टाकल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- गेल्यादेशासह राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. यातच या रोगाचा काहीसा प्रभाव हा नगर जिल्ह्यात देखील झालेला पाहायला मिळाला आहे. यातच एका धक्कादायक बाब समोर आली आहे.

नुकतेच राहाता तालुक्यातील हनमंतगाव, हसनापूर शिवेजवलील चराजवळ विलास योसेफ ब्राम्हणे यांच्या वस्ती जवळ अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळेस शेकडो कोंबड्या आणून टाकल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे .

बर्ड फ्लूमुळे नागरिकांत आधीच भितीचे वातावरण आहे. त्यात रविवारी रात्री अज्ञात इसमाने बहुतेक चार चाकी वाहनात मृत कोंबड्या आणून टाकल्या. हा परिसर निर्जन असल्याने सकाळी उशीरा हा प्रकार लक्षात आला.

तोपर्यंत कुत्रे पक्षी यांनी कोंबड्यवर ताव मारल्याने आजाराचा धोका वाढला आहे. दरम्यान गावातील सामाजिक कार्येकर्ते अशोक घोलप यांना ही वार्ता समजल्यानंतर

त्यांनी लोणी येथील सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिघे प्राणीमित्र विकास म्हस्के यांना कल्पना दिली. डॉ. दिघे व म्हस्के यांनी सदर ठिकाणाला भेट दिली.

जेसीबीच्या साह्याने कोंबड्या पुरण्यात आल्या. कोंबड्या टाकणारी व्यक्ती जवळच्या परिसरातील माहीतीची असावी. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe