अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील काही मच्छीमारांसमवेत समुद्रात डुबकी घेतली आहे.
त्याआधी बोटीमधून ते केरळच्या कोल्लम समुद्रकिनारी पोहोचले होते. जेव्हा मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी जाळं पाण्यात टाकलं तेव्हा त्यांच्याबरोबर राहुल गांधी देखील पाण्यात उतरले. जवळपास 10 मिनिटं त्यांनी त्याठिकाणी पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतला.
कोल्लम जिल्ह्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी बुधवारी केरळमध्ये दाखल झाले. या वेळी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उडी घेतली. त्यांच्याबरोबर राहुल गांधीही समुद्रात उतरले.
राहुल गांधी तब्बल 10 मिनिटे समुद्रात होते. समुद्रात त्यांनी मासेमारांशी मासे पकडण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा केली, आणि पुन्हा नावेत चढले. यावेळी मच्छिमारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे मला जाणून घ्यायाचे होते, असे राहुल गांधीनी सांगितले.
राहुल यावेळी म्हणाले, “आज सकाळी मी मच्छिमार बांधवांबरोबर समुद्रात गेलो, बोटीच्या प्रवासाची सुरूवात झाल्यापासून शेवट होईपर्यंत त्यांनी खूप कष्ट घेतले, मच्छीमारांनी जाळे समुद्रात फेकले व काही वेळाने बाहेर काढले,
पण एवढे करूनदेखील आमच्या जाळ्यात फक्त एकच मासा पकडला गेला. यावरून आम्हाला कळाले, सगळ्या पद्धतींचा नीट अवलंब करून, एवढे परिश्रम घेऊनही झालेला खर्च भरून निघत नाही.
मी विचार करीत होतो की जाळे पुष्कळशा माशांनी भरले जाईल, परंतु ते रिकामेच राहीले. मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी हे बघितलं. दरम्यान राहुल यांचा समुद्रात पोहण्याची मजा घेत असतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|