अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा 91किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
विशेषबाब म्हणजे लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या या शिक्षकाने हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवशंकर मूळचा वारंगल-आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहे. हैद्राबादच्या कुकटपल्ली येथील एका शाळेत तो शिक्षक आहे. बेलतरोडी पोलिसांना माहिती मिळाली होती की, कार (क्र. डीएल-४सीएडी-३६६५) मधून गांजाची तस्करी होत आहे.
ती कार वर्धा मार्गाने दिल्लीला जाणार आहे. पोलिसांनी वर्धा मार्गावर सापळा रचला व त्याला कारसह ताब्यात घेतले. यावेळी ४ प्लॅस्टिकच्या पोत्यांमध्ये ९१ किलो ५५६ ग्रॅम गांजा आढळला.
पोलिसांनी कार चालक शिवशंकरला ताब्यात घेतले. कार, मोबाईल, गांजा आणि रोख असा एकूण १८.८४ लाख रुपयांचा माल जप्त केला.
शिवशंकर गुरूजी म्हणाले की हैद्राबादच्या एका शाळेत मी शिक्षक आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले होते. या दरम्यान शाळेतीलच एका शिक्षकाने गांजा तस्करीची आयडीया दिली.
तसेच एक कार दिल्लीला पोहोचविण्यास सांगितले आणि यासाठी १० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखविले. त्याच्याकडे बेरोजगार असल्याने तो यासाठी तयार झाला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|