मोदी सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली : मंत्री थोरात

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले आहेत. ते भांडवलदार धार्जिणे, नफेखोर व साठेबाजांकरिता आहेत.

मूठभर लोकांकरिता केलेले कायदे हे शेतकऱ्यांसाठी नसून या माध्यमातून नफेखोरी होऊन सर्वसामान्य जनतेचे जीवन कठीण होणार आहे, असे प्रतिपादन करत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कायद्यांचा निषेध करीत सरकारला आता

चलेजाव म्हणण्याची वेळ आल्याचे सांगितले. श्रीरामपुरात शुक्रवारी केंद्र सरकारने विना चर्चेने मंजूर केलेल्या तीन शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ, शंभर दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर असलेल्या

शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तसेच इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषणप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, उपाध्यक्ष ज्ञानदेव वाफारे,

उपनगराध्यक्ष करण ससाणे, इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, अरुण नाईक, संजय छल्लारे, अंकुश कानडे, बाबासाहेब दिघे, संजय फंड, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, अ‍ॅड. समिन बागवान, अभिजित लिप्टे, अण्णासाहेब पाटील,

सुभाष सांगळे आदी उपस्थित होते. कोरोनाबाबत मंत्री थोरात म्हणाले, आता लॉकडाऊन करू नये. किती वेळा लॉकडाऊन करायचे, व्यवहार बंद ठेवायचे.

त्यातून अर्थव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होता. जनता जर काळजी घेणार नसेल आणि संख्या रोजच वाढत जाणार असेल तर शेवटी पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe