अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-केंद्र सरकारच्या खर्चातून लसीकरण केल्यावर प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र येते.
जर महाराष्ट्रात कोरोनाची लस हि राज्य सरकारच्या खर्चातून दिली तर महाराष्ट्राचा नकाशा आणि जय महाराष्ट्र असे छापावे, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व या विषाणूला अटकाव करण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे.
दरम्यान लसीकरण झालेल्यांना प्रमाणपत्र मिळते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. आता पुढील टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे.
या लसीकरणाचा भार राज्यांनी उचलावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने ही लस मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे जर ही लस राज्य सरकारच्या खर्चातून देण्यात येणार असेल तर त्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘जय महाराष्ट्र’ असे छापून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
व्यक्तीपेक्षा राज्य आणि राज्यातील जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे राज्याचा नकाशा असावा, असे आमचे मत आहे. या मागणीला तरुणाईचा पाठिंबा मिळत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|