वॉर्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुुरु करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-अहमदनगर महापालिकेने वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

१८ ते ४५ वयोगटासाठी मोफत लस सुरू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. तेथे कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्राची नगर शहरातील संख्या कमी असल्याने असले प्रकार होत आहे.

त्यामुळे महापालिकेने वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

लसीकरण केंद्राच्या जागेसाठी अडचण असेल तर खासगी जागा देण्यासाठी आपण पुढाकार घेवू. सामाजिक संस्थाही जागा देण्यास तयार असून तसेच शाळा खोल्यांमधून केंद्र सुरू करता येणे शक्य आहे.

बारस्कर यांनी पत्रात सावेडी उपनगरासह शहरातही वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News