अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यातच जामखेड मधील कोविड सेंटर सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.
जामखेड मधील कोविड सेंटरमधील आमदार रोहित पवार यांचा डान्स सध्या व्हायरल झाल्या पासून काही जणांनी यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कोविड सेंटरमधील नृत्यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.
‘आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो.
नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवारांवर टीका केली आहे.
“रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात.
सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम