कोरोनामुळे आज सर्वांचीच बिकट परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थिती…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  स्व.दिगंबर ढवण यांनी अल्पकाळातच पाईपलाईन रोड, ढवणवस्ती परिसरात लोकउपयुक्त कार्य करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.

उपनगराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांचे प्रश्­न सुटावेत, त्यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे या भागात अनेक विकास कामे होऊन या भागाचा कायापालट झाला. कोरोनामुळे आज सर्वांचीच बिकट परिस्थिती झाली आहे.

अशा परिस्थिती एकमेकांना प्रत्येकाने आधार देण्याची गरज आहे. स्व.दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त किरणा वाटप करुन त्यांचे कार्य पुढे सुरु आहे, हीच त्यांच्या स्मृतीस खरी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

स्व.दिगंबर (महाराज) ढवण यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विचार मंचच्यावतीने ढवणवस्ती येथे किरणा वाटप करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, सच्चा शिवसैनिक म्हणून स्व.दिगंबर ढवणे यांचे नाव सर्वात पुढे आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्­न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. परिसराच्या विकासासाठी अहोरात्र काम करुन या भागात विकास कामांची गंगा त्यांनी आणली. तपोवन रोडसाठी 38 मोर्चे काढले होते.

आज हा रस्ता झाला याचे संपूर्ण श्रेय हे स्व.ढवण यांनाच जाते. नागरिकांच्या प्रश्­नांसाठी नगर शहरात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात स्व.ढवण यांचा हातखंडा होता. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाप्रती ऋण व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News