योद्धा पुन्हा मैदानात… नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरुवात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.

यातच राणे यांनी येत्या काळात आम्ही उत्तर देऊ म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणेंना अटक झाल्यानंतर त्यांची त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. मात्र आज पासून पुन्हा आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. योद्धा पुन्हा मैदानात, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे.

ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असं लिहिलं आहे.

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यापाठीमागील ठोस कारण आणखी समजू शकलेलं नाही.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने मंगळवारी राज्यात वादळी घडामोडी घडल्या. राणेंना जामीन मंजूर झाला झाला असला तरी हे प्रकरण अद्याप निवळलेलं नाही. येत्या काळात या जनआशीर्वाद यात्रेमध्ये शिवसेनेवर टीका करेल कि नाही आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News