आजपासून आपल्या दिवसाची सुरवात करणार आहोत अध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांनी चला तर वाचुयात आपल्या मनाविषयी एक सुंदर लेख
शुद्ध मन हा आपल्याजवळचा सर्वांत मोठा अलंकार आहे. इतर अलंकार शरीराचे सौंदर्य वाढवतात; परंतु मनाच्या शुद्धतेचा प्रवाह अंतरंगाकडे असतो. म्हणूनच माणसाच्या मनातील शुद्धता संतांना लाखमोलाची वाटते.
आपला खिसा एकवेळ भरलेला नसला तरीही चालतं. आपला खिसा गरम नसला तरीही चालतं ; पण आपण मनानं नेहमीच श्रीमंत रहावं. आपलं मन हे नेहमीच समुद्रासारखं विशाल ठेवावं. त्यात सर्वांसाठी जागा असावी.
पैसे किंवा इतर कारणांनी एखाद्याची पारख करू नये. मनाची श्रीमंती हीच खरी असते, त्याची जाण ठेवावी. कारण , कुठल्या धार्मिक स्थळाचा कळस हा जरी सोन्याचा असला तरीही आपल्याला डोकं टेकवावं लागतं ते त्या धार्मिक स्थळांच्या दगडी पायरीवरच.
ज्याला निरपेक्ष वृत्तीनं हे असं डोक टेकवणं जमतं, तो जग जिंकू शकतो. जग जिंकण्यासाठी माणसाला नक्की काय हवं असतं ??? पैसा, ताकद, सैन्य, शक्ती, युक्ती, बुद्धी की आणखी काही . . ?
प्रश्न एकच असला तरीही विचार वेगवेगळे आणि उत्तरही वेगवेगळी ; पण या उत्तरांच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट नक्कीच ध्यानात येईल ती म्हणजे , जग जिंकण्यासाठी अनेक मार्ग आहेत ; पण ते मार्ग अंगीकारण्यासाठी आपल्या अंगी कोणते तरी असे विशिष्ट गुण असणं आवश्यक असतं.
माणसाचं मन हे विशाल असावं लागतं . ते चांगलं असावं लागतं . या गुणांच्या भरवशावर माणूस जग जिंकू शकतो. मग , तो माणूस कुठल्याही परिस्थितीतून आलेला असू दे , तो दिसायला कसाही असू दे किंवा त्याचा स्वभाव कसाही असू दे .
जर त्याचा स्वभाव चांगला असेल , जर त्याचं मन शुद्ध असेल तर त्याला यश नक्कीच मिळतं . ज्यांच्या अंगी चांगले गुण असतात , त्यांची प्रगती , त्यांचा विकास हा आपोआपच होत राहतो .
(महत्वाची सूचना :- आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या [email protected] या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.)