अहमदनगर – पुणे महामार्गावर रुग्णवाहिका उलटली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी येथून अतितातडीने एका महिलेला प्रसूतीसाठी पुणे येथे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात होऊन उलटली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली असून चालक व सदर रुग्णवाहिकेमधील डॉक्‍टरांना किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात कोरेगाव भीमा नजीक वाडागाव फाटा येथे येथे झाला. 

 याबाबत लक्ष्मण दादू ओव्हाळ (रा. लोहगाव, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगर येथे येथील रुग्णालयामध्ये एक महिला प्रसूतीसाठी आलेली दाखल झालेली असताना तिच्यावर आवश्‍यक असलेले उपचार अहमदनगर येथे होऊ शकत नसल्याने तिला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर या महिलेला शासकीय रुग्णवाहिकेतून (एमएच 14 सीएल 1060) पुणे येथील ससून रुग्णालयात घेऊन जात असताना कोरेगाव भीमा नजीक वाडागाव फाटा येथे आल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या या अल्टो कारला (एमएच 12 क्‍यूएफ 1682) रुग्णवाहिकेची धडक बसली. यामध्ये रुग्णवाहिका जागेवरच उलटली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment