श्रीपाद छिंदमकडून ‘त्या’ निर्णयास आव्हान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्याच्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदमने न्यायालयात आव्हान दिले आहे.

त्याच्याकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून,

१६ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.

मागील वर्षी महापालिकेच्या महासभेने केलेला तसा ठराव ग्राह्य धरताना मंत्री शिंदे यांनी तो ठराव कायम केला व विद्यमान नगरसेवकपद रद्द केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment