PPF Scheme : ‘या’ सरकारी योजनेत पैसे गुंतवून बना करोडपती ! अशी करा गुंतवणूक !

Sonali Shelar
Updated:
Public Provident Fund Scheme

Public Provident Fund Scheme : सध्या बाजरात अशा अनेक योजना आहेत. ज्या तुम्हाला श्रीमंत बनवण्यास पुरेशा आहेत. पण बाजारात असणाऱ्या काही योजना या जोखमीच्या योजना आहेत. अशातच काही गुंतवणूकदर जोखीम घेण्यास तयार नसतात, त्यांच्यासाठी सरकारद्वारे चालवली जाणारी PPF योजना उत्तम पर्याय आहे. PPF योजनेत गुंतवणूक करून भविष्यात श्रीमंत होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. जी भारत सरकार द्वारे चालवली जाते, त्यामुळे ही पूर्णपणे सुरक्षित योजना आहे. तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. या सरकारी योजनेचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही 1,000, 2000 किंवा 12,000 रुपये गुंतवून 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मोठा निधी गोळा करू शकतास.

देशातील पीपीएफवरील व्याजदर भारत सरकार ठरवते. सध्या PPF वर ७.१ टक्के दराने व्याज मिळते आहे. पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले आणि तुम्हाला 7.10 टक्के दराने व्याज मिळाले तर 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 27,12,139 मिळतील. यातील तुमची एकूण गुंतवणूक 15,00,000 असेल आणि तुम्हाला 12,12,139 व्याज मिळतील.

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF खात्यात वार्षिक फक्त 500 रुपये गुंतवू शकता. तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिसर्‍या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यंत गरज पडल्यास त्यावर कर्जही घेऊ शकता. पीपीएफवर मिळणारे व्याज करमुक्त आहे. याशिवाय, तुम्हाला या गुंतवणुकीवर आयकर कायद्यांतर्गत 80C अंतर्गत सूटही मिळू शकते.

5 वर्षे पैसे काढू शकत नाही

तथापि, पीपीएफ खाते उघडल्यापासून पुढील 5 वर्षे तुम्ही तुमचे पैसे काढू शकत नाही. 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून पैसे काढता येतात. तथापि, जर तुम्ही 15 वर्षापूर्वी पैसे काढले तर तुम्हाला 1% दंड भरावा लागतो.

PPF खाते कोण उघडू शकते?

कोणतीही व्यक्ती कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत त्याच्या/तिच्या नावाने हे खाते उघडू शकते. याव्यतिरिक्त, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते दुसर्‍या व्यक्तीसाठी देखील उघडले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe