EV Charging Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे का? ‘या’ चार महत्त्वाच्या टिप्स वापरा आणि वाहनाचे होणारे नुकसान टाळा

EV Charging Tips:- सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढताना दिसून येत आहे व दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व सध्या विशद होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर या वाहनांचा वापर येणाऱ्या काळात वाढेल अशी स्थिती दिसून येत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे जे काही प्रदूषण होते ते बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमुळे खूप कमी प्रमाणात होत असल्याने पर्यावरण सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व खूप आहे. सध्या अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करत असून यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर आपल्याला वाहने  चार्ज करणे गरजेचे असते. जेव्हा बॅटरी चार्ज होते तेव्हा त्या गाड्या धावू शकतात हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु जर आपण या वाहनांच्या बाबतीत चार्जिंग करताना काही गोष्टींची काळजी करणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

नाहीतर चार्जिंग ची पद्धत किंवा चार्जिंग करण्याची वेळ चुकली तरी देखील इलेक्ट्रिक वाहनांचे नुकसान होऊ शकते. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा कुठल्या टिप्स वापराव्या? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.

 इलेक्ट्रिक वाहने चार्ज करा परंतु या गोष्टीची काळजी घ्या

1- वाहनाची बॅटरी 0% वर येऊ देऊ नका- तुमच्या इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरी कधीही पूर्णपणे शून्य टक्यावर म्हणजेच ड्रेन होऊ देऊ नका. जर तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी सतत शून्य टक्के म्हणजेच ड्रेन होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या बॅटरीच्या लाईफ वर होतो.

साधारणपणे वाहनाची बॅटरी जेव्हा 20% असेल किंवा त्याच्या जवळपास असेल तेव्हा ती चार्ज करणे योग्य राहते. जर बॅटरी पूर्णपणे डाऊन असेल तर तिला चार्ज होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तान येण्याचा संभव असतो. म्हणून हे टाळण्यासाठी बॅटरी 20% च्या आसपास असेल तेव्हा ती चार्ज करणे चांगले राहते.

2- बॅटरी ओव्हरचार्ज म्हणजे जास्त चार्ज करू नये- आपल्यापैकी बऱ्याच जणांना मोबाईल फोन जरी राहिला तरी तो 100% चार्ज करण्याची सवय असते. परंतु ही सवय तुमच्या बॅटरीचे आयुष्य कमी करते. अगदी हीच बाब वाहनाच्या बॅटरीच्या संबंधित देखील दिसून येते.

यामध्ये जर आपण वाहनांच्या बॅटरीचा विचार केला तर यामध्ये बॅटरी मधील जो काही लिथियम आयन असतो तो प्रामुख्याने 30 ते 80 टक्के चार्जिंग वर चांगला काम करतो. परंतु जर आपण बऱ्याचदा नियमितपणे शंभर टक्के चार्जे केली तर त्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग म्हणजेच बॅटरी ही 80% पर्यंत चार्ज करणे गरजेचे आहे.

3- वाहन चालवून आणल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करू नये- त्यापैकी बऱ्याच जणांना गाडी कुठून बाहेर चालवून आल्यानंतर लगेच ते चार्जिंग लावायची सवय असते. परंतु वाहन चालवून आल्यानंतर लगेच बॅटरी चार्जिंग लावणे टाळावे. जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा लिथियम आयन बॅटरीज मोटरला पावर देताना त्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण करत असते.

अशावेळी जर तुम्ही वाहन चालवून आणले व लगेचच चार्जिंग लावली तर ते धोकादायक असू शकते. असे केल्याने वाहनांमध्ये थर्मल प्रॉब्लेम देखील निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्याकरता प्रामुख्याने वाहन चालवून आणल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने किंवा वाहन किंवा बॅटरी थंड झाल्यानंतरच ती चार्जिंगला लावावी.

5- बॅटरी सतत चार्जिंग लावू नये- बऱ्याच जणांना वाहन थोडे फिरवून आणले तरी थोडे थोडे वेळा करता ती चार्जिंग लावायची सवय असते. याचा वाईट परिणाम वाहनाच्या बॅटरीवर होऊ शकतो.

सतत चार्जिंग लावत राहिल्यामुळे लवकर बॅटरी खराब होण्याची संभावना वाढते व बॅटरीची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला खरच बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे तेव्हाच तिला चार्जिंग लावावी हे महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe