अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  कर्जत तालुक्यातील खांडवी येथे परवा झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या काकासाहेब मच्छद्रिं तापकीर वय ३० या तरूणाचा काल दुपारी नगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

खांडवी येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (९ एप्रिल) दोन गटात वाद झाला. त्यावेळी दोन्ही गटांनी कर्जत पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या.

त्या वादात प्रवीण पोपट तापकीर यास मार लागून २० टाके पडले होते. त्याच पूर्वीच्या भांडणाचे रूपांतर पुन्हा कालच्या वादात झाले, व या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.

रविवारी झालेल्या हाणामारीत काकासाहेब मच्छद्रिं तापकीर वय ३० याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने नगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी २ वाजता त्याचे निधन झाले. यानंतर पोलिस प्रशासनाची धावपळ झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी खांडवीमध्ये जाऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment