आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्याशी माझी नाळ जोडलेली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार अरूणकाका जगताप यांनी केले.

पारनेर नगरपंचायतीच्या सोबलेवाडीत 1 कोटी विविध विकासकामांचा शुभारंभ आ. अरूण जगताप व आ.निलेश लंके यांच्या हस्ते शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला.

या कार्यक्रमाचे दि. 24 जुन रोजी पारनेर नगरपंचायत हद्दितील प्रभाग क्र. 4 मधील नगरसेविका विजेता विलास सोबले यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजुर झालेले पारनेर नगरपंचायत हद्दीतील सोबलेवाडी स्मशानभुमी,

बुगेवाडी स्मशानभूमी, सोबलेवाडी ते बुगेवाडी रस्ता डांबरीकरण, सोबलेवाडी सी.डी.वर्क, पोखरन्याआई मंदिर सभामंडप व खोली बांदकाम या विकासकामांचे

भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अरुणकाका जगताप व शुभहस्ते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पुस्तके गणवेश दप्तर देण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment