अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : मतदारसंघातील नागरिक आशेचा किरण शोधण्याच्या प्रयत्नात असून कार्यकर्त्यांनी जनतेचा संपर्क न तोडता सक्षम पर्याय निर्माण करावा,
असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले. वाघुंडे येथील सभामंडपाचे औटी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी तेे बोलत होते.
औटी म्हणाले, हंगा नदीतून वाहून जाणारे पाणी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातूून आपण अडवले. शेती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. पिढ्यान् पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतरसुद्धा मतदानाच्या वेळी लोक विचलीत का होतात हे न उलगडणारे कोडे आहे.
प्रश्न निवडणुकीतील माझ्या यश-अपयशाचा नसून विकासाची परंपरा खंडित झाली हे महत्त्वाचे आहे. विकासाची परंपरा सुरू करणे व त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
पराभूत आहे या मानसिकतेमधून मी बोलत नसून माझ्या कारकिर्दीत विधानसभेत मतदारसंघ ज्या उंचीवर नेऊन ठेवला होता ती उंची आज कोण सांभाळणार हा खरा प्रश्न आहे.
मतदारसंघात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. गणेश शेळके, राहुल शिंदे यांनी जनतेचा आधार म्हणून उभे राहिले पाहिजे. हे दुरुस्त करण्यासाठी जनतेला सोबत घेण्याची जबाबदारी तुम्ही उचला, पुढील जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी माझी.
तालुक्यातील काही वेगळ्या गोष्टी कानावर पडतात त्यावेळी वाईट वाटते. असे सांगत पदाचे गांभीर्य तुम्हाला कधी कळणार, असा टोला लगावला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews