अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या म्हाळादेवी येथील ६१ वर्षीय इसमाचा मृतदेह काल दि. २५ सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात आढळून आला.

चंद्रभान परशुराम हासे (रा. म्हाळादेवी) असे मयत इसमाचे नाव आहे. म्हाळादेवी येथील गायदेवना ओढ्याजवळ निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सुरु आहे.

ठेकेदाराचा रखवालदार संदीप हासे त्या परिसरात असताना त्याला दुर्गंध आल्याने ही बाब उघड झाली. त्याने तातडीने सरपंच प्रदीप हासे यांना कळविले.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत हासे यांचा मृतदेह कालव्याच्या खड्ड्यात पडलेला होता. हासे आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News